-अनिल भोईर
क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १७ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धा २०१८-१९ चे आयोजन परभणी येथे करण्यात आले आहे. यास्पर्धेचे उद्घाटन १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पाथरी चे माजी नगराध्यक्ष तथा नप गट नेते जुनेद खान दुर्रांनी यांच्या हस्ते थाटात उदघाटन संपन्न झाले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी २ मैदानावर एकूण ८ सामने खेळवण्यात आले. मुलाचे ४ सामने तर मुलीचे ४ सामने खेळवण्यात आले. ८ विभागातून एकूण १६ संघानी सहभाग घेतला होता. लॉट्स प्रमाणे सर्व सामने बादफेरी पध्दतीने खेळवण्यात आले.
१७ वर्ष मुले/ मुली राज्यस्तरीय शालेय स्पर्धेचं उद्घाटन सामना मुलाच्या विभागात नाशिक विभाग विरुद्ध पुणे विभाग झाला. यासामन्यात नाशिक विभागाने आक्रमक खेळ करत पुणे विभागावर ४०-२६ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
मुलीच्या विभागात उद्घाटन सामना नाशिक विभाग विरुद्ध अमरावती विभाग मध्ये झाला. चुरशीच्या सामन्यात नाशिक विभागाने अमरावती वर ४३-३६ असा विजय मिळवत पुढील प्रवेश मिळवला. नाशिक विभागाच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.मुलीच्या दुसऱ्या सामन्यात औरंगाबाद विभागाने पुणे विभागाचा ३६-१६ असा पराभव केला, तर मुलाच्या दुसऱ्या सामन्यात कोल्हापूरने नागपुर विभागाचा ४९-२२ असा धुव्वा उडवला.
कोल्हापूर विभागाच्या मुलींनी पण नागपूर विभागाच्या मुलीचा ५०-३३ असा पराभव केला.
पहिल्या दिवसाचे सामने संपले तेव्हा मुलाच्या विभागात नाशिक, कोल्हापूर अमरावती व मुंबई विभागाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळावला आहे. तर मुलींच्या विभागात नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर व लातूर विभागाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी उपांत्य फेरीचे व अंतिम फेरीचे सामने खेळवण्यात येतील.
१७ वर्ष मुली विभाग सामन्याचे निकाल:
१) नाशिक विभाग ४३ विरुद्ध अमरावती विभाग ३६
२) पुणे विभाग १६ विरुद्ध औरंगाबाद विभाग ३६
३) मुंबई विभाग २३ विरुद्ध लातूर विभाग २८
४) नागपुर विभाग ३३ विरुद्ध कोल्हापुर विभाग ५०
१७ वर्ष मुले विभाग सामन्याचे निकाल:
१) नाशिक विभाग ४० विरुद्ध पुणे विभाग २६
२) नागपुर विभाग २२ विरुद्ध कोल्हापुर विभाग ४९
३) मुंबई विभाग २६ विरुद्ध औरंगाबाद २३
४) अमरावती विभाग ५५ विरुद्ध लातुर विभाग २९
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कप २०१८: टीम इंडियाला मोठा धक्का, हे तीन खेळाडू स्पर्धेबाहेर
–एशिया कप २०१८: सुपर फोरचे सामने पूर्वनियोजित असल्याचा कर्णधारांचा आरोप?
–एशिया कप २०१८: भारताचा पाकिस्तानवर ८ विकेट्सने मोठा विजय