सिडनी। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकादश मधील आज (28 नोव्हेंबर) सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. या मुसळधार पावसामुळे आज एकही चेंडू खेळला गेला नाही.
सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाला सुरूवात झाली होती. मात्र नंतर पाऊस थांबल्याने दोन्ही संघाच्या खेळाडूंना खेळण्याची आशा होती. परंतु आज नाणेफेकही घेण्यात आला नाही. तर पावसाला परत सुरूवात झाल्याने काही वेळातच आजचा खेळ रद्द करण्यात आला.
Unbelievable it’s 5:45am. The amount of water on the road already is incredible. #Sydneyweather pic.twitter.com/rBf8HZ4ly8
— Dave Stanley (@daveystan1) November 27, 2018
सिडनीमधील असा धुवांधार पाऊस 100 वर्षांत एकदाच होतो, असे साऊथ वेल्सच्या हवामान शास्त्रज्ञांनी अहवाल दिला. काल रात्रीपासूनच पाऊल पडत असल्याने आज स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता खेळ सुरू करण्याची निर्णय घेण्यात आला होता.
Incredible scenes in Sydney today after 90ml fell in Just 2 hours.
Just got sent this from a mate who works near the harbour bridge.#SydneyStorm #sydneyrain pic.twitter.com/pCkWKFydUL— Tom O'Neil (@thomasjameoneil) November 27, 2018
तसेच उद्याच्या खेळाला स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरूवात होणार असून त्याच्याअगोदर 9.30 वाजता नाणेफेक होणार आहे. तसेच उर्वरित तीन दिवस खेळ 30 मिनिटांचा अधिक होणार आहे.
आजचा खेळ रद्द झाल्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीने इशांत शर्मा आणि मुरली विजयसोबत जिममध्ये सराव केला.
The rain doesn't seem to be going away so we decided to make something of our day ✌️💪. Gotta love a good workout with the boys. #makeeverydaycount pic.twitter.com/E94yPIcpRv
— Virat Kohli (@imVkohli) November 28, 2018
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मधील चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना 6 डिसेंबरला अडलेडमध्ये खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–हा दिग्गज म्हणतो, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा नकोच
–ज्या विक्रमासाठी सचिनला २१ वर्ष लागली तो विराट केवळ ७ वर्षांत मोडणार
–मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस