---Advertisement---

आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत आज दिग्गज कबड्डीपटूंचा खेळ पहायची संधी

On: गुरूवार, फेब्रुवारी 22, 2018 4:11 PM
---Advertisement---

पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या आज तिसऱ्या दिवशी दिग्गज कबड्डीपटूंचा खेळ पहायची संधी कबड्डीप्रेमींना मिळणार आहे. 

एकलव्य स्टेडियम,  हरियाणा येथे पार पडलेल्या पंडित दिन दयाल उपाध्याय मेमोरियल ऑल इंडिया नॅशनल स्टाईल कबड्डी चॅम्पियन्सशिप २०१८ स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलेला ओएनजीसी संघ आज या स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणार आहे. 

संध्याकाळी ४ वाजता बीपीसीएल विरुद्ध ईआयएल असा पहिला सामना होणार असुन दुसरा सामना ओएनजीसी विरुद्ध एमआरपीएल असा ५ वाजता रंगणार आहे. 

बीपीसीएलच्या संघाचा रिशांक देवाडिगा कर्णधार असुन निलेश शिंदे, विशाल माने, नितीन मदने, गिरीष एर्नाक, काशिलींग अडके आणि रोहीत राणा सारखे स्टार खेळाडू आहेत. तर ओएनजीसीकडून जसवीर सिंग, राजेश नरवाल, मनप्रीत सिंग, अमित राठी हे खेळाडू भाग घेताना दिसतील. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment