पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल संघाने ईआयएल संघाचा 34-21 असा सहज पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली तर ओएनजीसी संघाने सीपीसीएल संघाचा 29-13 असा दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबिन फेरीत महेंद्र राऊतच्या बिनचूक चढायांच्या बळावर बीपीसीएल संघाने ईआयएल संघाचा 34-21 असा सहज पराभव पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा सामना जिंकून हॉट्रीक केली.
सूरूवातीपासूनच आक्रमक चढाया करून महेंद्रने ईआयएल संघावर दबाव निर्माण केला. मध्यंतरापुर्वी 17-9 अशी भक्कम आघाडी घेतली. नितिन मोरेने अरविंद व आर.एस राणा यांच्या कौशल्यपुर्ण पकडी करून ईआयएल संघाचा खेळ निश्प्रभ केला. सामन्याच्या सुरूवातीला घेतलेली आघाडी सामन्याच्या शेवटपर्यंत कायम राखत बीपीसीएल संघाने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.
दुस-या लढतीत ओएनजीसी संघाने सीपीसीएल संघाचा 29-13 असे पछाडत दणदणीत विजय मिळवला. मध्यंतरापुर्वी 13-3 असे गुण असताना ओएनजीसी संघाने सीपीसीएल संघावर लोन चढवून दबाव निर्माण केला. ओएनजीसी संघाकडून सोमवीरने 10 चढायांमध्ये 9 गुण मिळवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मनप्रीतने सर्वाधीक पकडी करून संघाला 29-13 असा मोठा विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंट रॉबिन फेरी
बीपीसीएल वि.वि ईआयएल 34-21 (17-9 मध्यांतरापुर्वी)
ओएनजीसी वि.वि सीपीसीएल 29-13 (19-6 मध्यांतरापुर्वी)
#Pune आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील सरावाच्या वेळीचे काही खास क्षण….@BPCLimited @IndianOilcl @ONGC_ @vishalpmane @RishankDevadiga pic.twitter.com/IGhm8BGdKS
— Sharad Bodage (@SharadBodage) February 22, 2018