केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील कबड्डीचे अंतिम फेरीचे सामने आज(18 जानेवारी) रंगणार आहेत.
यात 17 वर्षांखालील मुलींच्या गटात हरियाणा विरुद्ध छत्तीसगढ़ असा सामना होणार आहे. तर 21 वर्षांखालील मुलींच्या गटात हिमाचल प्रदेश विरुद्ध हरियाणा या संघात सामना होणार आहे.
त्याचबरोबर 17 वर्षांखालील मुलांच्या गटात राजस्थान विरुद्ध हरियाणा या संघात अंतिम सामना होणार आहे. तसेच 21 वर्षांखालील मुलांच्या गटात चंदीगढ़ विरुद्ध तमिळनाडू संघात अंतिम सामना होणार आहे.
महाराष्ट्राच्या फक्त 21 वर्षांखालील मुलींच्या संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करण्यात यश आले होते पण त्यांना हिमाचल प्रदेश विरुद्ध उपांत्य फेरीत पराभव स्विकारावा लागला. मात्र महाराष्ट्राचे 17 वर्षांखालील मुले/मुली आणि 21 वर्षांखालील मुले यांचे संघ उपांत्य फेरीआधीत स्पर्धेबाहेर पडले होते.
असे आहे खेलो इंडियातील कबड्डीच्या अंतिम फेरीचे वेळापत्रक –
दुपारी 01.20 वाजता – हरियाणा विरुद्ध छत्तीसगढ (17 वर्षांखालील मुली)
दुपारी 02.05 वाजता – हिमाचल प्रदेश विरुद्ध हरियाणा (21 वर्षांखालील मुली)
संध्या. 07.00 वाजता – राजस्थान विरुद्ध हरियाणा (17 वर्षांखालील मुले)
रात्री 08.00 वाजता – चंदीगढ विरुद्ध तमिळनाडू (21 वर्षांखालील मुले)
महत्त्वाच्या बातम्या-
–देवगड मधील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पहिल्या दिवसाचे निकाल






