22 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला (2nd Test Match) सुरुवात होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना (Day-Night Test Match) खेळणार आहेत.
या सामन्याबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने असे हिंदुस्तान टाईम्सला (Master Blaster Sachin Tendulkar) त्याची काही मते मांडली आहेत.
या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. हा गुलाबी चेंडू खेळताना भारतीय खेळाडूंना कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल याबद्दल हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सचिन म्हणाला, परिस्थिती ज्या प्रकारे बदलत जाईल तसे तुम्हाला समजेल की गुलाबी चेंडूत काय बदल होत आहेत.
” ज्या खेळा़डूंनी गुलाबी चेंडूने खेळले आहे त्यातील काही क्रिकेटपटूंकडून मी ऐकले आहे की संध्याकाळ झाल्यानंतर गुलाबी चेंडू पाहण्यास समस्या निर्माण होत असते. मी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. चेंडूच्या आवरणावरील शिवण पाहणे कठीण महत्त्वाचे आहे,” असे सचिन म्हणाला.
“चांगले फलंदाज नेहमी गोलंदाजाच्या हाताचे मनगट, हाताची बोटे आणि चेंडूचे शिवण पाहत असतात. तेव्हा चेंडूची शिवण दिसणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही गुलाबी चेंडूचीही शिवण दिसणे महत्त्वाच आहे.” असेही सचिन म्हणाला.
चेंडूच्या या स्थितीवर बोलताना सचिन म्हणाला की, गुलाबी चेंडू जास्त स्विंग करू शकतो.
“बॅट आणि बाॅलमध्ये संतुलन असले पाहिजे. असे झाले नाहीतर क्रिकेट धीम्या गतीचे होईल. कसोटी सामन्यातील पहिले सत्र महत्त्वाचे ठरते. यामध्ये गुलाबी चेंडू, लाल चेंडू किंवा पांढरा चेंडू असला तरीही बॅट आणि बाॅलमधील संतुलन कसोटी क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी महत्त्वाचे आहे.”, असेही सचिन म्हणाला.
त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशिपबद्दल बोलताना सचिन म्हणाला, कसोटी सामन्यात आताच्या पिढीचा उत्साह राखणे महत्त्वाचे आहे.
का सचिनचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना भारतीयांना पाहता आला नव्हता?
वाचा👉https://t.co/ZZUnubgdic👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #SachinTendulkar— Maha Sports (@Maha_Sports) November 15, 2019
बालदिनानिमित्त विराट, सचिनसह या दिग्गज खेळाडूंनी दिल्या अशा शुभेच्छा…https://t.co/jt92q7Az6D#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi
— Maha Sports (@Maha_Sports) November 15, 2019