---Advertisement---

भारत विरुद्ध बांगलादेश: इंदोर कसोटीत मयंक अगरवालचे शानदार शतक पूर्ण!

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 12:34 PM
---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश संघात गुरुवारपासून पहिला कसोटी सामना होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आज भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने शतकी खेळी केली आहे.

त्याने 183 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने त्याचे हे शतक पूर्ण केले. अगरवालचे हे कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक आहे.

त्याने हे शतक करण्याबरोबरच पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारीही केली. मात्र पुजारा 54 धावा करुन बाद झाला. या डावात पुजारापाठोपाठ भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही शून्य धावेवर बाद झाला.

सध्या अगरवालबरोबर उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळत असून या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. तसेच भारताने पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा पार केला आहे.

तत्पूर्वी या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 150 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---