---Advertisement---

सीएसकेला दिलासा! कागिसो रबाडासह ‘हा’ दिल्लीकर मुकणार सुरुवातीच्या आयपीएल सामन्याला

On: बुधवार, एप्रिल 7, 2021 9:28 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 14 व्या पर्वाला 9 एप्रिल पासून सुरूवात होणार असून या आयपीएल पर्वासाठी दिल्ली कॅपिटल संघाचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए यांनी मंगळवारी मुंबई गाठली आहे. परंतु कोरोना विषाणू मुळे त्यांना सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

यामुळे शनिवारी (10 एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणाऱ्या आयपीएल सामन्यात त्यांना खेळता येणार नाही. मागील मोसमात दिल्ली संघाला अंतिम फेरीत नेण्यात दक्षिण आफ्रिकेच्या या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दिल्ली संघाने एका निवेदनात म्हटले आहे की, “दिल्ली कॅपिटल संघाचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए मंगळवारी मुंबईतील हॉटेलमध्ये पोहोचले असून एक आठवडाभर ते क्वारंटाईन राहणार आहेत. दिल्ली कॅपिटल संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या हंगामाच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे या हंगामात दिल्ली संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंत हा कर्णधार असणार आहे.”

‌नॉर्किए आणि रबाडा हे दोघे दिल्लीचे मुख्य वेगवान गोलंदाज आहेत आणि या दोघांनी मिळून मागील मोसमात 52 विकेट घेत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु अंतिम सामन्यात दिल्ली संघाला मुंबई इंडियन्स संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

लेडी बाहुबली! चक्क दोनदा अनुष्काने विराटला अलगद उचललं; आरसीबी कर्णधाराच्या तोंडून निघालं, ‘ओए तेरी’

Video: आयपीएलपुर्वी मॅक्सवेलचा धुमाकूळ, नेट्समध्ये विचित्र ‘रिव्हर्स स्वीप’ शॉट मारत गोलंदाजांचे उडवले होश

धोनीने ‘तो’ सल्ला दिला अन् माझं नशीब बदललं; टी नटराजनने सांगतली ‘राज की बात’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---