इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडत आहे. आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 26 मार्च) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात पार खेळला जाणार आहे. गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या दिल्ली संघ अंतिम सामन्यात आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तसेच, यूपी वॉरियर्झ महिलांना पराभूत केल्यानंतर मुंबई संघाचाही आत्मविश्वास वाढला आहे. अशात हरमनप्रीत कौर हिचा संघ पहिला-वहिला किताब नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेत या दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली. एकेवेळी मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women) संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी होता. मात्र, नंतर दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने अव्वलस्थान मिळवले. त्यानंतर दोन्ही संघांनी स्पर्धेतील प्रत्येकी 6 सामने जिंकले. दिल्लीने चांगल्या रनरेटच्या आधारे थेट अंतिम सामन्यात धडक दिली. तसेच, मुंबईला एलिमिनेटर सामना खेळावा लागला. आता दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघात अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात…
कधी खेळला जाणार दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघातील अंतिम सामना?
दिल्ली विरुद्ध मुंबई संघातील डब्ल्यूपीएल 2023 (WPL 2023) स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि. 26 मार्च) खेळला जाणार आहे.
कुठे खेळला जाणार दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघातील अंतिम सामना?
दिल्ली विरुद्ध मुंबई संघातील डब्ल्यूपीएल 2023 (WPL 2023) स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर (Brabourne Stadium) खेळला जाणार आहे.
किती वाजता खेळला जाणार दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघातील अंतिम सामना?
दिल्ली विरुद्ध मुंबई संघातील डब्ल्यूपीएल 2023 (WPL 2023) स्पर्धेतील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. त्यापूर्वी 7 वाजता नाणेफेक होईल.
कोणत्या चॅनेलवर पाहता येईल दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन्स महिला संघातील अंतिम सामना?
दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध मुंबई इंडियन महिला संघातील अखेरचा सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येऊ शकतो. याव्यतिरिक्त ज्या युजर्सकडे जिओ सिनेमा (Jio Cinema) ऍप आहे, ते ऑनलाईन स्ट्रीमिंगमार्फत मोबाईलवर सामन्याचा आनंद लुटू शकतात. (dc vs mi wpl 2023 final live streaming match dates timings and venue know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटी कळलंच! विराट कोहली वापरतो ‘या’ कंपनीचा मोबाईल, किंमत लाखोंच्या घरात
मुंबईच्या वाघाचे ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मराठमोळ्या अंदाजात स्वागत; नेटकरीही म्हणाले, ‘एकच छावा’