मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडलेल्या एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स महिला संघाने 72 धावांनी जिंकला. शुक्रवारी (दि. 24 मार्च) खेळल्या गेलेल्या महिला प्रीमिअर लीग 2023 मधील या एलिमिनेटर सामन्यात मुंबई संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून देताच कर्णधार हरमनप्रीत कौर हिने इतिहास रचला. मात्र, मुंबईच्या या विजयाचे पहिल्या आयपीएलवेळीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाशी साधर्म्य दिसून आले.
मुंबईच्या विजयासह मुंबई इंडियन्स WPL अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला. आयपीएलच्या पहिल्या हंगामातही चेन्नई सुपर किंग्सने दुसऱ्यांदाच हा मान मिळवला होता. त्यावेळी चेन्नईचे नेतृत्व करणाऱ्या एमएस धोनी व आता मुंबईची कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौर या दोघांचा जर्सी क्रमांक सात आहे. त्यावेळी चेन्नईच्या आणि आता मुंबईच्या खेळाडूने हंगामातील पहिली हॅट्रिक नोंदवली. दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या पहिल्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा करून दाखवलेल्या. तसेच, पहिल्या हंगामात सलग चार सामने जिंकणारे हेच दोन संघ आहेत.
मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ महिला (Mumbai Indians Women vs UP Warriorz Women) संघातील नाणेफेक एलिसा हिली हिने जिंकली होती. यावेळी तिने गोलंदाजीचा निर्णय घेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वातील मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी मुंबईने नॅट सायव्हर-ब्रंट हिच्या नाबाद 72 धावांच्या जोरावर 20 षटकात 4 विकेट्स गमावत 182 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना यूपीच्या नाकी नऊ आल्या. त्यांना 17.4 षटकात 10 विकेट्स गमावत 110 धावाच करता आल्या. मुंबईकडून इझी वोंग (Issy Wong) हिने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ती स्पर्धेत हॅट्रिक घेणारी पहिली महिला खेळाडूही ठरली. यासह मुंबईने हा सामना 72 धावांनी खिशात घातला.
(Some Coincidence Between 2008 CSK In IPL And 2023 Mumbai Indians In WPL)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL2023 । पराभवाचा वचपा काढत मुंबईची फायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; इलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सची धुळधाण
VIDEO । एलिमिनेटर सामन्यात हरमनप्रीतवर नामुष्की, यूपीच्या सोफीने केले क्लीन बोल्ड