---Advertisement---

पहिलं प्रेम सोडून ‘तिने’ धरला क्रिकेटचा हात, WPL स्पर्धेत गुगलीने दिग्गज खेळाडूंना देतेय त्रास

On: शुक्रवार, मार्च 24, 2023 6:07 PM
Parshavi-Chopra
---Advertisement---

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असताना एक खेळाडू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्या खेळाडूने 16व्या वर्षी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊन विजेतेपदही पटकावले आहे. ही खेळाडू इतर कुणी नसून पार्शवी चोप्रा आहे. पार्शवी चोप्रा डब्ल्यूपीएल स्पर्धेत यूपी वॉरियर्झ संघाकडून खेळत आहे. तिला फक्त 3 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्यातही पार्शवीने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले.

पार्शवी चोप्रा महिला प्रीमिअर लीग (Parshavi Chopra Womens Premier League) स्पर्धेपूर्वी 19 वर्षांखालील टी20 विश्वचषकात खेळली होती. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा खेळल्या गेलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले होते. भारताच्या विजयात पार्शवी चोप्रा (Parshavi Chopra) हिचे मोलाचे योगदान होते. तिने स्पर्धेत 11 विकेट्स चटकावल्या होत्या. गोलंदाजीची हीच धार तिने आता डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धेतही दाखवली आहे. या स्पर्धेपूर्वी तिने तिच्या गुगलीवर खूपच मेहनत घेतली आणि याचा फायदा तिला स्पर्धेतही झाला.

पार्शवीने डब्ल्यूपीएलमध्ये फिरकीने केले प्रभावित
डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेत गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्झ संघात 17वा सामना पार पडला होता. या सामन्यात गुजरातने सुरुवातीचे 3 विकेट्स लवकर गमावले होते. त्यानंतर डी हेमलता आणि ऍशले गार्डनर यांच्या जोडीने 93 धावांची भागीदारी रचली होती. हेमलता आणि गार्डनरच्या जोडीने यूपीच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली होती. या जोडीची भागीदारी मोडण्यासाठी यूपी वॉरियर्झ (UP Warriorz) संघाची कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) हिने अखेरच्या षटकात चेंडू 16 वर्षीय पार्शवीकडे सोपवला. या युवा फिरकीपटूने 2 षटकातच दोन्ही फलंदाजांना आपल्या गुगलीच्या जाळ्यात अडकवले आणि तंबूत धाडले. अशाप्रकारे गुजरात संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. यूपीने हा सामना 3 विकेट्सने आपल्या नावावर केला.

https://twitter.com/wplt20/status/1637777607868702726

पार्शवीच्या गुगलीने दिग्गजांना दिला त्रास
पार्शवी चोप्रा हिने 19 वर्षांखालील विश्वचषक आणि महिला प्रीमिअर लीगमध्ये मिळालेल्या वेळेत आपल्या गोलंदाजीवर काम केले. विशेषत: तिने तिच्या गुगलीवर खूप मेहनत घेतली. त्यामुळेच मोठमोठ्या खेळाडूंनाही पार्शवीच्या चेंडूवर धावा करता आल्या नाहीत. तिने यावेळी धावा खर्च करण्याऐवजी विकेट घेण्यावर लक्ष दिले.

पार्शवी कशी बनली क्रिकेटपटू?
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्याप्रमाणे पार्शवी चोप्रा हिचे पहिले प्रेम स्केटिंगच होते. मात्र, वडील- आजोबा घरामध्ये नेहमी क्रिकेटबाबत चर्चा करायचे. 2017मध्ये स्वत: पार्शवीनेही महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला इंग्लंडकडून हारताना पाहिले होते. यानंतर पार्शवीनेही क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले. तसेच, तिने हळूहळू स्केटिंग सोडून क्रिकेटपटू बनण्याच्या दिशेने पावले टाकली. तिच्या मनात भारताकडून खेळण्याचा विचार येऊ लागला, जो 19 वर्षांखालील विश्वचषक खेळण्यासोबत पूर्ण झाला. (special story about u19 t20 world cup winner parshvi chopra know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यह मुंबई मेरी जान! एमआयचे नवे ऍंथम रिलीज, दाखवली शहराची ओळख, पाहा व्हिडिओ
सीएसकेच्या गोटात खळबळ! आयपीएल 2022 गाजवलेला गोलंदाज दुखापतग्रस्त, होऊ शकतो संपूर्ण हंगामातून बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---