जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाला सुरुवात होण्यासाठी अवघ्या 6 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या नव्या हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केलीये. स्पर्धेतील आजवरचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने या नव्या हंगामासाठी आपले नवे ऍंथम सॉंग रिलीज केले असून, त्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1639221389281435649?t=Msow4KKSVUgC9XLymgPpbQ&s=19
मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. पहिल्या हंगामापासून मुंबई इंडियन्सच्या दुनिया हिला देंगे या ऍंथम सॉंगने चहा त्यांना एकत्रित केले होते. मात्र, नव्या हंगामाआधी फ्रॅंचाईजीने मुंबई मेरी जान हे नवे ऍंथम सॉंग प्रसारित केले. या नव्या गाण्यात मुंबईची ओळख असलेली बेस्ट बस, रिक्षा, वडापाव, ढोल पथक व अरुंद गल्ल्या या सर्व गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव या लोकल बॉईजसह संघातील इतरही खेळाडू व संघमालक नीता अंबानी यादेखील या नव्या व्हिडिओमध्ये दिसतायेत.
त्याआधी मुंबई इंडियन्सने आपल्या नव्या जर्सीवर मुंबई लोकल, वांद्रे वरळी सी लिंक, इंडिया गेट व समुद्र या गोष्टींना जागा दिली आहे.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ –
रिटेन लेलेले खेळाडू –
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, ऋतिक शौकीन, ईशान किशन, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय सिंग, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंग, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, कॅमरून ग्रीन, झाय रिचर्डसन, पीयूष चावला, डुआन जॅनसन, विष्णु विनोद श, शम्स मुलानी, नेहल वधेरा, राघव गोयल.
(Mumbai Indians Released New Anthem For IPL 2023 Mumbai Meri Jaan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नई वनडेतील पराभवानंतर दिग्गजाने विराटला सुनावले खडे बोल! म्हणाला, “अशा परिस्थितीत फटके खेळताना…”
केकेआरला खिंडार! IPL 2023पूर्वी आणखी एका खेळाडूला मोठी दुखापत, आता कसं होणार?






