---Advertisement---

DC vs RCB: दोन्ही संघांनी रचला इतिहास, 11 वर्षांचा जुना विक्रम मोडीत

On: मंगळवार, एप्रिल 28, 2026 4:19 PM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सोमवारी अरुण जेटली स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएल इतिहासात कधीही न झालेला विक्रम घडला. अपेक्षेप्रमाणे धावांचा पाऊस न पडता हा सामना अत्यंत कमी धावसंख्येत संपला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा डाव अवघ्या 16.3 षटकांत 75 धावांवर आटोपला. आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना पूर्णपणे रोखून धरले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने केवळ 6.3 षटकांत 1 विकेट गमावून 77 धावा करत 9 विकेट्सने सहज विजय मिळवला. जोश हेझलवूडला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारा देण्यात आला. दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने 9000 आयपीएल धावांचा टप्पा पार केला. शिवाय अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.

या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून केवळ 152 धावा केल्या, जो या दोन संघांमधील आयपीएल इतिहासातील सर्वात कमी एकूण स्कोर ठरला. यापूर्वी 2015 मध्ये या दोन्ही संघांमध्ये एकूण 194 धावा झाल्या होत्या. त्यामुळे हा विक्रम आता मोडीत निघाला आहे.

विशेष म्हणजे, दिल्ली आणि बेंगळुरू यांच्यातील सामने सहसा उच्च धावसंख्येसाठी ओळखले जातात. मात्र, आतापर्यंत केवळ दोन वेळाच या दोन्ही संघांचा एकत्रित स्कोर 200 च्या आत राहिला आहे, ज्यामुळे हा सामना आणखी खास ठरतो.

दरम्यान, आरसीबीने या सामन्यात 81 चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवला, जो त्यांच्या इतिहासातील चेंडूंच्या दृष्टीने सर्वात मोठा विजय आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून जिंकण्याचा विक्रम मात्र मुंबई इंडियन्सच्या नावावर असून त्यांनी 2009 मध्ये 87 चेंडू बाकी ठेवून सामना जिंकला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---