इंडियन प्रीमियर लीग 2025च्या 32व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर जोरदार लढत होणार आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने सलग चार सामने जिंकत विजयी मोहीम सुरू केली होती, परंतु मागील सामन्यात त्यांना त्याच मैदानावर पहिला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे दिल्लीसाठी पुन्हा विजयपथावर परतण्याचे लक्ष्य असणार आहे.
दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा हंगाम काहीसा निराशाजनक ठरला आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी फक्त दोन सामने जिंकले असून, आजचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स सध्या 5 पैकी 4 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. जर त्यांनी आज राजस्थान रॉयल्सचा पराभव केला तर ते टेबलमध्ये पहिल्या स्थानावर येईल. तर राजस्थान रॉयल्स विजयानंतर सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर जाईल आणि सध्या सातव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सची घसरण होईल.
दिल्ली विरुद्ध राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड
एकूण सामने: 29
दिल्ली कॅपिटल्स जिंकले – 14 वेळा
राजस्थान रॉयल्स जिंकले – 15 वेळा
अरुण जेटली स्टेडियमवर एकूण 90 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 43 वेळा आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 46 वेळा विजय मिळवला आहे. 45 वेळा ज्या संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली ती संघ जिंकला, तर 44 वेळा नाणेफेक हरलेला संघ जिंकला.
दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य प्लेइंग 11
जेक फ्रेझर-मॅकगर्क, करुण नायर, अभिषेक पोरेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार (इम्पॅक्ट प्लेयर)
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, यष्टिरक्षक), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिश थिक्षाणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, कुमार कार्तिकेय (इम्पॅक्ट प्लेयर)






