---Advertisement---

4 वर्षांनंतर IPL मध्ये सुपर ओव्हरचा थरार, दिल्लीने राजस्थानला दिली मात!

On: गुरूवार, एप्रिल 17, 2025 8:33 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 32व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 188 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, राजस्थान संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि नितीश राणा यांनी अर्धशतके झळकावली, परंतु त्यांचा संपूर्ण संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 188 धावाच करू शकला. अशा परिस्थितीत, सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून लागला.

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने चांगली सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात एक मजबूत सलामी भागीदारी झाली, परंतु सॅमसन 31 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. यावेळी रियान परागला अक्षर पटेलने 8 धावांवर क्लीन बोल्ड झाला. यशस्वी जयस्वालने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. तो 37 चेंडूत 51 धावा करून बाद झाला.

राजस्थानने 112 धावांवर आपला दुसरा बळी गमावला, त्यानंतर नितीश राणा आणि ध्रुव जुरेल यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. जेव्हा आरआरचा संघ सहज विजयाकडे वाटचाल करत होता, तेव्हा नितीश 51 धावांवर बाद झाला आणि सामना येथेच फिरला. सामना अशा टप्प्यावर पोहोचला जेव्हा राजस्थानला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता होती आणि मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता.

राजस्थानच्या हातात 7 विकेट शिल्लक होत्या, सेट फलंदाज ध्रुव जुरेल आणि डॅशिंग खेळाडू शिमरॉन हेटमायर क्रीजवर उपस्थित होते. पण दोघांनीही शेवटच्या षटकात सिंगल-डबल रणनीती अवलंबून आरआरसाठी समस्या निर्माण केली. शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या होत्या, पण राजस्थानला फक्त एक धाव करता आली आणि सामना बरोबरीत सुटला.

सुपर ओव्हरचा थरार

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी (सुपर ओव्हर):
दिल्लीकडून मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. राजस्थानकडून शिमरॉन हेटमायर आणि रियान पराग फलंदाजीला उतरले.

पहिला चेंडू वाया गेला (डॉट बॉल)
दुसऱ्या चेंडूवर हेटमायरने चौकार ठोकला
तिसऱ्या चेंडूवर हेटमायरने एक धाव घेतली
चौथ्या चेंडूवर रियान परागने चौकार मारला, पण तो चेंडू नो-बॉल ठरला
जेव्हा पुन्हा चौथा चेंडू टाकण्यात आला, तेव्हा रियान पराग धावबाद झाला
पाचव्या चेंडूवर हेटमायरने 2 धावा घ्यायचा प्रयत्न केला, पण दुसरी धाव घेताना जयस्वाल धावबाद झाला

एकूण धावा – 11
दिल्लीसमोर विजयासाठी 12 धावांचे लक्ष्य होते.

दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी (सुपर ओव्हर):
दिल्लीकडून के.एल. राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स मैदानात उतरले. राजस्थानकडून संदीप शर्मा गोलंदाजीला आला.

पहिल्या चेंडूवर राहुलने 2 धावा घेतल्या
दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला
तिसऱ्या चेंडूवर एक धाव मिळाली
चौथ्या चेंडूवर संदीपने शॉर्ट बॉल टाकला, ज्यावर स्टब्सने षटकार ठोकून सामना जिंकवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---