आयपीएल 2025 स्पर्धेतील 32 वा सामना आज म्हणजेच 16 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ अक्षर पटेल व राजस्थान रॉयल्स हा संघ संजू सॅमसन यांच्या नेतृत्वाखाली मैदानात खेळण्यासाठी उतरणार आहेत. राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व दिल्ली संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे.
आत्तापर्यंत दिल्ली कॅपिटल्सने 4 सामने जिंकलेले आहे तर, राजस्थानने आत्तापर्यंत 2 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन –
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल , अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा





