---Advertisement---

यु मुंबाची हाराकिरी! दबंग दिल्लीचे अव्वलस्थान भक्कम

On: सोमवार, जानेवारी 31, 2022 9:39 PM
DD-UM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ च्या ८५ व्या सामन्यात यु मुंबा व दबंग दिल्ली हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर आले. चाहत्यांनाही या सामन्यात थरारक लढतीची अपेक्षा होती. लो स्कोरिंग मात्र अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पूर्ण वेळेनंतर पहिल्या क्रमांकावरील दिल्लीने यु मुंबाला ३६-३० असे पराभूत केले.

पुन्हा एकदा नविन कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या दिल्लीसाठी सामन्याची सुरुवात चांगली झाली. त्यांनी लवकरच पाच गुणांची आघाडी घेत मुंबईला ऑल आउटकडे नेले. मात्र, हरेन्‍द्र व कर्णधार फजल अत्राचली यांनी दोन सुपर टॅकल करत ऑल आउट टाळला. तर युवा शिवम याने तीन गुण घेतले. दिल्लीसाठी विजय मलिक व आशू मलिक यांनी प्रत्येकी चार गुण घेतले. हाफ-टाईमपर्यंत सामना १२-१२ असा बरोबरीत होता.

दुसऱ्या हाफची सुरुवात होताच मुंबईने दिल्लीला ऑल आउट करत आघाडी घेतली. मात्र, आशू मलिकने सलग गुण घेत आघाडी एका गुणांपर्यंत कमी केली. त्यानंतर दोन्ही संघांनी देखील दुहेरी गुण घेत गुणफलक हलता ठेवला. परंतु, दिल्लीला यु मुंबाला मागे सोडण्यात अपयश येत होते. अखेरीस विजय मलिक व नरेंद्र यांनी ३४ व्या मिनिटाला ही कामगिरी करून दाखवली. एकदा मिळालेली आघाडी दिल्लीने कायम राखली. अखेरच्या दोन मिनिटात नरेंद्र सिंग हे दोन गुणांची रेड करत दिल्लीला तीन गुणांची निर्णायक आघाडी मिळवून दिली. दीड मिनिटे शिल्लक असताना दिल्लीने मुंबईला ऑल आउट करून सहा गुणांची आघाडी मिळवत विजय जवळपास पक्का केला. अखेरीस मुंबईला ३६-३० असा पराभव पत्करावा लागला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---