दिल्ली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उद्या(13 मार्च) फिरोजशहा कोटला मैदानावर पाचवा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे. या सामन्याआधी दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशन(डीडीसीए) विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांचा सन्मान करणार होते. पण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
बीसीसीआयने आयपीएलचा उद्धाटन सोहळा रद्द करुन त्याचा सर्व निधी शहीद जवानांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर डीडीसीएनेही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या सामन्याआधी दिल्लीतील दिग्गजांचा सन्मान करण्याचा निर्णय रद्द केला.
याबद्दल डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले, ‘आम्ही सेहवाग, गंभीर आणि कोहलीला सन्मानित करण्याचे निर्णय घेतला होता. पण बीसीसीआयही आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करत असल्याने आम्हीही आमचा निर्णय रद्द केला.’
‘आम्ही 10 लाख रुपये दिल्ली पोलिस शहीद निधीसाठी देणगी देणार आहे. आत्ता 90 टक्के तिकीट विक्रीसाठी ठेवण्यात आले होते, ते सर्व विकले गेले आहेत.’
तसेच डीडीसीए भारताचे नेतृत्व केलेल्या दिल्लीच्या सर्व माजी खेळाडूंना दोन व्हीआयपी पास देणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीनेही सुरुवातीला केल्या आहेत चूका, पंतबरोबर होत असलेली तुलना अयोग्य…
–टीम इंडियाची धुलाई करणारा टर्नर या संघाकडून गाजवणार आयपीएल
–टेलरने ज्या खेळाडूचा विक्रम मोडला त्याचीच मागितली माफी