संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सध्या सातवा पुरुष टी२० विश्वचषक खेळला जात आहे. स्पर्धेतील सामने रोमांचक होत असताना, अचानक एका गंभीर मुद्दामुळे या स्पर्धेला वेगळे वळण लागले. दक्षिण आफ्रिकेचा वरिष्ठ क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक याने आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असलेल्या ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या चळवळीला पाठिंबा न देता, प्रत्येक सामन्याआधी गुडघ्यावर हात टेकून बसण्यास नकार दर्शवला होता. याचाच एक भाग म्हणून त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून अंग काढून घेतलेले. मात्र, हे प्रकरण चांगलेच चिघळल्यानंतर आता त्याने माफी मागितली असून, या चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
डी कॉकने मागितली माफी
क्विंटन डी कॉक याने मंगळवारी झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून अखेरच्या क्षणी माघार घेतली होती. सातत्याने ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ चळवळीला पाठिंबा देण्यासाठी त्याने गुडघ्यावर बसण्यास नकार दिलेला. माझ्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. दोन दिवसांनंतर आता त्याने या प्रकरणाबाबत एक निवेदन दिले आहे. यामध्ये त्याने लिहिले,
“सर्वांची माफी मागून मी या पत्राची सुरुवात करतो. मला हा क्विंटनचा मुद्दा बनवायचा नव्हता. मला वर्णद्वेषाच्या विरोधात उभे राहण्याचे महत्त्व समजले असून, मी यासाठी लोकांना प्रेरित करेल. माझ्यामुळे निर्माण झालेला गैरसमज, गोंधळ आणि द्वेष यासाठी मी दिलगीर आहे.”
डी कॉकने या पत्रात आपल्या कुटुंबाचा व लहानपणापासून अनुभवलेल्या वर्णद्वेषी घटनांचा उल्लेख देखील केला आहे.
अमेरीकेत झाली होती सुरुवात
मागील वर्षी अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय कलाकाराच्या हत्येनंतर संपूर्ण जगभरात ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ ही चळवळ उभी राहिली होती. वेस्टइंडीज आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या चळवळीची सुरुवात केली. त्याला इतर देश ही नेहमीच पाठिंबा देत आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुम्ही इथून निघून जा’, लाईव्ह शोमध्ये चॅनल होस्टकडून शोएब अख्तरचा घनघोर अपमान; पाहा व्हिडिओ
गोलंदाजाने फलंदाजाला काढले वेड्यात, सापळा रचून केले स्टंपिंग; पाहा विकेट ऑफ द मॅच!
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘हा’ मॅचविनर झाला दुखापतग्रस्त