दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कसोटी कर्णधार आणि दिग्गज सलामीवीर डीन एल्गर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताविरुद्धची कसोटी मालिका ही एल्गरसाठी कारकिर्दीतील शेवटची मालिका असणार आहे. म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपला शेवटचा सामना खेळल्यानंतर एल्गर पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये दिसणार नाही.
डीन एल्गर (Dean Elgar) याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या. त्याने देशासाठी एकूण 84 कसोटी सामने खेळले आहेत. यात 37.02च्या सरासीरने 5146 धावा एल्गरने नावावर केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 13 शतके आली. 36 वर्षीय दिग्गज फलंदाजाने हा निर्णय घेतल्याची माहिती शुक्रवारी (22 डिसेंबर) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून दिली गेली. कर्णधार म्हणून एल्गरने दक्षिण आफ्रिकेसाठी 17 सामने खेळले आणि त्यापैकी 9 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघ जिंकला आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार एल्गर म्हणाला, “सर्वजण म्हणतात त्याप्रामाणे प्रत्येक चांगली गोष्टी एक दिवशी संपते. भारताविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिका माझ्या कारकिर्दीतील शेवटची मालिका असणारआ हे. मी या अप्रतिम खेळातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या खेळाने मला खूपकाही दिले आहे. केपटाऊनमधील सामना माझ्यासाठी शेवटची कसोटी असेल. हे माझे जगातील सर्वात आवडते स्टेडियम आहे. याचठिकाणी मी पहिली कसोटी धाव केली होती आणि शेवटची कसोटी धावही इथेच करेल, अशी अपेक्षा आहे.”
Dean Elgar to retire from international cricket after the Test series against India. pic.twitter.com/a1gue72jmU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 22, 2023
“क्रिकेट खेळणे हे नेहमीच माझे स्वप्न राहिले होते. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे नेहमीच मोठी गोष्ट असते. 12 वर्ष मला हे काम करता येईल, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. हा एक सुंदर प्रवास होता,” असेही एल्गर म्हणाला. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका ही दोन सामन्यांची असेल. मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर म्हणजेच बॉक्सिंग डे दिवशी सुरू होईल. तसेच दुसरा आणि शेवटचा सामना नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात 3 जानेवारी रोजी सुरू होईल. (Dean Elgar announced his retirement from international cricket)
महत्वाच्या बातम्या –
Tushar Deshpande Marriage: CSK चा खेळाडू तुषार देशपांडे अडकला लग्नबंधनात, ‘स्कूल क्रश’सोबत घेतले सात फेरे
भारताला मोठा धक्का; आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट परतला भारतात, तर ऋतुराज झाला मालिकेतून बाहेर