दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) भारतीय संघाला पहिला पराभव गुरुवारी (६ डिसेंबर) पहायला मिळाला. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने सात विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयानंतर दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. दक्षिण अफ्रिकेला विजय मिळवून देण्यासाठी त्यांचा कर्णधार डीन एल्गर (dean elger) याची खेळी महत्वपूर्ण ठरली. एल्गरने संघाला विजय मिळवून देण्यासोबतच स्वतःच्या नावावर खास विक्रमाची नोंद केली.
दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने या सामन्याच्या स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. पहिल्या डावात एल्गरला २८ धावांवर समाधान मानावे लागले होते. परंतु, दुसऱ्या डावात त्याने नाबाद ९६ धावांची खेळी केली. त्याने या धावा १८८ चेंडूत केल्या आणि यादरम्यान १० चौकार ठोकले. एल्गरने सामन्याच्या दुसऱ्या डावात केलेल्या खेळीनंतर त्याना सामनावीर निवडले गेले. या खेळीच्या जोरावर तो भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या इतिहासात दुसरी सर्वात मोठी खेळी करणारा कर्णधार ठरला.
भारताविरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात मोठी खेळी करणाऱ्या दक्षिण अफ्रिकी कर्णधारांचा विचार केला, तर या यादीत पहिल्या क्रमांकावर केपलर वेसेल्स (kepler wessels) आहेत. त्यांनी १९९२ मध्ये डर्बनमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ११८ धावांची खेळी केली होती. डीन एल्गरने या यादीत दुसरे स्थान गाठले आहे. एल्गरने भारताविरुद्धच्या जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ९६ धावांची नाबाद खेळी केली. यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा केपलर वेसेल्स यांचेच नाव आहे. वेसेल्स यांनी १९९२ मध्ये पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ९५ धावांची नाबाद खेळी केली होती.
दरम्यान, उभय संघातील दुसऱ्या सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्या डावात २०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात २२९ धावा करून २७ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने २६६ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या डावात विजयासाठी २४० दावांचे लक्ष्य मिळाले होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकने ११८ धावा करून दोन विकेट्स गमाव्या होत्या. डीन एल्गरने चौथ्या दिवसी ४६ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि ९६ धावा करून शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला.
महत्वाच्या बातम्या –
PHOTO: क्विंटन डी काॅक बनला बाप माणूस, नवजात परीचा नावासह शेअर केलाय फोटो
जोहान्सबर्ग कसोटीत कोणीही जिंको, इतिहास तर घडणार! का? वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा –