---Advertisement---

IND vs SA: कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या डीन एल्गरचं लक्षवेधी विधान, म्हणाला, ‘माझ्यासाठी हाच…’

On: बुधवार, जानेवारी 3, 2024 9:20 AM
Dean-Elgar-Retirement
---Advertisement---

Dean Elgar Retirement: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (3 जानेवारी) केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना डीन एल्गर याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या निरोपाच्या सामन्यापूर्वी, त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बरेच काही सांगितले आहे. त्याने कसोटी क्रिकेटचे विश्वचषक असे वर्णन केले आहे.

डीन एल्गर (Dean Elgar) म्हणाला, “मी फक्त जिंकण्यासाठी खेळतो. मला आकडेवारीची पर्वा नाही. मी फक्त सामना आणि मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित करतो. या सर्वात मोठ्या आठवणी आहेत ज्या तुम्ही संघासोबत शेअर करू शकता. कसोटी मालिका जिंकणे नेहमीच महत्त्वाचे असते. कदाचित विश्वचषक जिंकणे ही यापेक्षा मोठी गोष्ट असू शकते पण मला कधीच विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे माझ्यासाठी हाच विश्वचषक आहे. हा माझा आखाडा आहे, जिथे मला जिंकायचे आहे.”

डीन एल्गर म्हणतो, “शेवटच्या कसोटीत कर्णधारपद देणं यापेक्षा मोठा सन्मान असूच शकत नाही. मी यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद भूषवले आहे. मी जवळपास दीड वर्ष कर्णधार होतो. या काळात मला व्यक्तिशः खूप काही शिकायला मिळाले. मी कर्णधार असो किंवा नसो, मी जेव्हा जेव्हा मैदानात असतो तेव्हा मी 100% देतो. युवा खेळाडूंना योग्य मार्ग दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे.”

डीन एल्गरने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 185 धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने भारतावर मोठी आघाडी घेतली आणि सामना एकतर्फी जिंकला. एल्गर गेल्या सामन्यातही ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला होता. त्याच्या निरोपाच्या कसोटीतही त्याच्याकडून मोठ्या खेळीच्या अपेक्षा आहेत.

डीन एल्गरने दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत 86 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 5000 हून अधिक धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या आठ फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होतो. त्याने 18 कसोटी सामन्यांमध्ये प्रोटीज संघाचे नेतृत्वही केले आहे. सुमारे दीड वर्षे तो कर्णधार होता. त्याच्या फेअरवेल टेस्टमध्ये त्याला पुन्हा एकदा कर्णधारपद देण्यात आलं आहे. (Dean Elgar’s striking statement playing the last Test of his career)

हेही वाचा

रोहित शर्माच ‘सिक्सर किंग’! 2023 मध्ये मारले विक्रमी षटकार; 10 वर्षात सातव्यांदा केला असा पराक्रम
ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा 190 धावांनी पराभव, कांगारूंनी 3-0 असा उडवला धुव्वा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---