---Advertisement---

आजपर्यंत जमलं नाही ते शेवटच्या मालिकेत केलं! जाणून घ्या निवृत्त होत असलेल्या एल्गरच्या शतकाचं महत्व

On: बुधवार, डिसेंबर 27, 2023 7:05 PM
Dean Elgar
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकाचा माजी कसोटी कर्णधार डीन एल्गर आपली शेवटची कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका भारताविरुद्ध असून सध्या सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पहिल्याच डावात एल्गरने अप्रतिम खेळ दाखवला. माजी कर्णधाराने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन अशा गोलंदाजांना उत्तर देत आपले शतक पूर्ण केले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 245 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेसाठी डीन एल्गर सलामीवीला उतरला. माजी कर्णधाराने 140 चेंडूत आपल्या 100 धावा पूर्ण केल्या. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे 14 वे शतक आहे. 36 वर्षीय एल्गर भारताविरुद्धची ही कसोटी मालिका संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. कारकिर्दीतील शेवटचा सामना एल्गर जानेवारी 3 ते 7 यादरम्यान भारताविरुद्ध खेळेल.

मागच्या 9 वर्षांमध्ये भारताविरुद्ध मायदेशात शतक करणारा डीन एल्गर दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. (Dean Elgar, playing his last international series, scored a century in the Boxing Day Test)

पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

महत्वाच्या बातम्या – 
भारताला महत्वाची विकेट मिळवून देण्यासाठी विराटने केली काळी जादू! पाहा व्हिडिओ
बजरंग आणि साक्षीनंतर विनेश फोगाटचा मोठा निर्णय, पंतप्रधानांनी पत्र लिहून परत केले पद्मश्री आणि अर्जून पुरस्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---