भारताचे माजी रणजीपटू सीके भास्करन नायर यांचे २१ नोव्हेंबरला अमेरिकेतील ह्यूस्टन येथे निधन झाले आहे. याबद्दल बीसीसीआयने दु:ख व्यक्त केले आहे. त्यांचे निधन झाले तेव्हा ते ७९ वर्षाचे होते. भास्कर यांच्यापाठीमागे त्यांची पत्नी चांदणी व रिता, सानिया व सोनिया या तीन मुली आहेत.
भास्करन हे ६० च्या दशकातील प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जात होते. त्यांचा जन्म १९४१ ला केरळमधील थलासेरीमध्ये झाला होता. त्यांनी केरळ आणि तमिळनाडू संघाचे रणजी स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना ४२ प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्यांनी १०६ विकेट्स घेतल्या. त्यांनी एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी ५ वेळा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी फलंदाजी करताना ५८० धावा देखील केल्या आहेत. ७६ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.
भास्करन हे सन १९६४ ला सीलोन विरुद्ध झालेल्या अनधिकृत कसोटी सामन्यात मन्सुर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून खेळले होते. त्यावेळी त्यांनी १८ षटकात ५१ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या.
“भास्कर हे मला दोन वर्ष ज्युनीयर होते. साठच्या दशकात आम्ही केरळ रणजी संघासाठी सलामीला गोलंदाजी करत असे. अतिशय पुरिपुर्ण गोलंदाजीची शैली असलेला भास्कर अतिशय वेगवान गोलंदाज होता. तो एक सक्रिय व सतत काहीतरी करणारा धडपड्या व्यक्ती होता. त्याने काही महिन्यापुर्वीच पॅराशुट जंपिंग देखील केले होते.” असे भास्कर यांच्याबद्दल बोलताना केरळचे माजी वेगवान गोलंदाज टीके माधव म्हणाले.
क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवल्यानंतर भास्करन युकेला गेले आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झाले. तसेच ते सर्व खेळांचे चाहते होते. १९७२ च्या ऑलिंपिक गेम्सनंतर त्यांनी जवळपास सर्व ऑलिंपिक स्पर्धांना हजेरी लावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या अनुभवी खेळाडूमध्ये आढळली कोविडची लक्षणे, न्यूझीलंड दौऱ्यातून पत्ता कट
वॉर्नरने घेतलं ‘बिग-बीं’चं रूप, सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न
आश्चर्यकारक! वॉर्नर कधीच नाही खेळणार बीबीएल? मांडली आपली समस्या






