पुणे ।पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी अ, डेक्कन अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत इलाईट डिव्हिजन गटात नंदन बाळ, अमित पाटणकर, ऋषी पाटसकर, मुकुंद जोशी, अजय कामत, मदन गोखले, मंदार वाकणकर, विक्रांत साने यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन अ संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 24-3असा एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात डेक्कन अ संघाने ओडीएमटी अ संघावर 24-1असा सहज विजय मिळवत सलग दुसरा विजय मिळवला.
अन्य लढतीत पीवायसी अ संघाने डेक्कन ब संघाचा 24-7असा पराभव केला. पीवायसी अ संघाकडून केदार शहा, डॉ.अभय जमेनीस, अभिषेक ताम्हाणे, केतन धुमाळ, प्रशांत सुतार, जयंत कढे, सुंदर अय्यर यांनी सुरेख कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: इलाईट डिव्हिजन
डेक्कन अ वि.वि.महाराष्ट्र मंडळ 24-3(100अधिक गट:नंदन बाळ/अमित पाटणकर वि.वि.संजय सेठी/हरीश सिरिपाल 6-2; खुला गट: ऋषी पाटसकर/मुकुंद जोशी वि.वि.विक्रम उंबरानी/विकास बचलू 6-0; 90अधिक गट: अजय कामत/मदन गोखले वि.वि.धनंजय पूर्वत/अभिजित कदम 6-0; खुला गट: मंदार वाकणकर/विक्रांत साने वि.वि.संजय सेठी/अर्पित श्रॉफ 6-1);
पीवायसी अ वि.वि.डेक्कन ब 24-7(100अधिक गट: केदार शहा/डॉ.अभय जमेनीस वि.वि.अमलेश आठवले/धनंजय सुमंत 6-2; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.अमोल बापट/इंद्रनील दाते 6-0; 90अधिक गट: प्रशांत सुतार/जयंत कढे वि.वि.बाळू जोशी/अतुल रुणवाल 6-2; खुला गट: सुंदर अय्यर/केदार शहा वि.वि.बाबू जाधव/कौस्तुभ शहा6-3);
डेक्कन अ वि.वि.ओडीएमटी अ 24-1 (100अधिक गट: मुकुंद जोशी/नंदन बाळ वि.वि.संतोष कुराडे/उदय गुप्ते 6-1; खुला गट: संग्राम चाफेकर/विक्रांत साने वि.वि.संतोष/सुखदा पंत 6-0; 90अधिक गट: अजय कामत/मदन गोखले वि.वि.अतुल मांडवकर/नितीन सिंघवी 6-0; खुला गट: ऋषी पाटसकर/मंदार वाकणकर वि.वि.चंदन नागडकर/कोनार कुमार 6-0);