पुणे: फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन चार्जर्स, टायगर्स, एफसी मेटालिका या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत डेक्कन चार्जर्स संघाने एसेस युनायटेड संघाचा 24-06 असा सहज पराभव करून आगेकूच केली. डेक्कन चार्जर्स संघाकडून नितीन जोशी, जयदीप डाली, मुकुंद जोशी, आशिष पुंगलिया, मदन गोखले, अजित सैल, ऋषिकेश पाटसकर, रक्षय ठक्कर यांनी विजयी कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात प्रशांत गोसावी, ऋतू कुलकर्णी, पराग नाटेकर, योगेश पंतसचिव, केदार शहा, अभिषेक ताम्हाणे, अनुप मिंडा, अमित लाटे यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर टायगर्स संघाने डेक्कन आरएफ संघाचा 24-03 असा एकतर्फी पराभव केला. अन्य लढतीत एफसी मेटालिका संघाने हॉक्स संघावर 23-14 अशा फरकाने विजय मिळवला.
साखळी फेरी:
डेक्कन चार्जर्स वि.वि.एसेस युनायटेड 24-06(100अधिक गट: नितीन जोशी/जयदीप डाली वि.वि.सुनील लुल्ला/मयूर पारेख 6-4; 90 अधिक गट: मुकुंद जोशी/आशिष पुंगलिया वि.वि.सुनील खेमचंदानी/जस्मित शौरी 6-0; खुला गट: मदन गोखले/अजित सैल वि.वि.अमित शर्मा/सुनील लुल्ला 6-2; खुला गट: ऋषिकेश पाटसकर/रक्षय ठक्कर वि.वि.हुजेफा हकीम/रोहन नाईक 6-0);
टायगर्स वि.वि.डेक्कन आरएफ 24-03(100 अधिक गट: प्रशांत गोसावी/ऋतू कुलकर्णी वि.वि.दिलीप धामणकर/समीर सावला 6-0; 90 अधिक गट: पराग नाटेकर/योगेश पंतसचिव वि.वि.अमित सुमंत/सुमंत डी. 6-1; खुला गट: केदार शहा/अभिषेक ताम्हाणे वि.वि.राहुल मंत्री/संदीप माहेश्वरी 6-0; खुला गट: अनुप मिंडा/अमित लाटे वि.वि. अमलेश आठवले/आशिष धोंगडे 6-2);
एफसी मेटालिका वि.वि.हॉक्स 23-14(100 अधिक गट: अभय सोनटक्के/सिद्धेश परळकर वि.वि.मंदार कापशीकर/अमृत मुळ्ये 6-4; 90 अधिक गट: नकुल फिरोदिया/महेंद्र देवकर पराभूत वि.बाळासाहेब पवार/सुनील आहिरे 5(2)-6(7); खुला गट: सुमित सातोस्कर/लक्ष्मण विडेकर वि.वि.अविनाश पवार/अनिरुद्ध जाधव 6-1; खुला गट: नितेश पांडेवाल/शौनक कासट वि.वि.सचिन कुलकर्णी/आशुतोष सोवनी 6-3);
महत्त्वाच्या बातम्या-
विजयी पुनरागमनासह केरला ब्लास्टर्स ‘टॉप फोर’मध्ये
चुरसीच्या लढतीनंतर गुजरात जायंट्स आणि पुणेरी पलटण संघातील सामना ३१-३१ ने बरोबरीत
यूपी योद्धांपुढे दबंग दिल्लीची शरणागती, ४४-२८च्या मोठ्या फरकाने सामना खिशात