पुणे। मुकुंद जोशी आणि डॉ.अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत ग्लॅडिएटर्स, लायन्स, एफसी जीएनआर या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात जितेंद्र जोशी, अमित पाटणकर, केदार पाठक, आदित्य खटोड, प्रसनजीत पॉल, विशाल साळवी, चिराग रुणवाल, यश चावडा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाने एफसी स्कॉर्पियन्स संघाचा 24-05 असा सहज पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात लायन्स संघाने सोलारिस गो गेटर्स संघावर 22-06 असा विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली. अन्य लढतीत एफसी जीएनआर संघाने मॉँटव्हर्ट प्रीस्टाईन 2 संघाचा 23-16 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून संजय रासकर, पुष्कर पेशवा, आशिष नवाथे, शांभवी नाडकर्णी, संग्राम चाफेकर, यश देशमुख यांनी सुरेख कामगिरी केली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आनंद काटीकर, आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे नीरज दुबे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डेक्कन ग्लॅडिएटर्स वि.वि.एफसी स्कॉर्पियन्स 24-05(100 अधिक गट: जितेंद्र जोशी/अमित पाटणकर वि.वि.हनुमंत साठे/बापू जाधव 6-3; 90 अधिक गट: केदार पाठक/आदित्य खटोड वि.वि.संजय पाटील/रवी बजाज 6-0; खुला गट: प्रसनजीत पॉल/विशाल साळवी वि.वि.अक्षय सरदेसाई/केतन मांडेकर 6-1; खुला गट: चिराग रुणवाल/यश चावडा वि.वि.आदित्य अभ्यंकर/संज्योत तावडे 6-1);
लायन्स वि.वि.सोलारिस गो गेटर्स 22-06(100 अधिक गट: अमित नाटेकर/राहुल मुथा वि.वि.सुबोध पेठे/आशिष कुबेर 6-0; 90 अधिक गट: ध्रुव मेड/सारंग पाबळकर पराभूत वि.अमोल गायकवाड/महेंद्र गोडबोले 4-6; खुला गट: नरहर गर्गे/रोहित शिंदे वि.वि.अश्विन हळदणकर/स्वरूप 6-0; खुला गट: सारंग देवी/रोहन दळवी वि.वि.आनंद परचुरे/सौरभ कारखानीस 6-0);
एफसी जीएनआर वि.वि.मॉँटव्हर्ट प्रीस्टाईन 2 23-16(100 अधिक गट: संजय रासकर/पुष्कर पेशवा वि.वि.गिरीश कुकरेजा/मिलिंद लिमये 6-4; 90अधिक गट: पंकज यादव/मनोज कुलकर्णी पराभूत वि.मनीष टिपणीस/सचिन माधव 5-6(2); खुला गट:आशिष नवाथे/शांभवी नाडकर्णी वि.वि.गिरीश कुकरेजा/जॉर्ज वरघसे 6-4; खुला गट: संग्राम चाफेकर/यश देशमुख वि.वि.सतीश/सोमनाथ पवार 6-2).