---Advertisement---

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत अमर इलेव्हन संघाची विजयी सलामी

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 7:20 PM
---Advertisement---

पुणे। अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत रवी तलवार(31 धावा व 2-13)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अमर इलेव्हन संघाने आदिनाथ क्रिकेट क्लब संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.

ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत झंकार बाजीकर(2-8), रवी तलवार(2-13), प्रशांत उत्तेकर(1-4)यांच्या अफलातून गोलंदाजीपुढे आदिनाथ क्रिकेट क्लबचा 64 धावांवर कोसळला. यात अथर्व कदम 12, श्रेयश जगदाळे 11, आदित्य जाधव नाबाद 10 यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान अमर इलेव्हन संघाने 4.5षटकात 2बाद 67 धावा करून पूर्ण केले. रवी तलवारने गोलंदाजी प्रमाणे फलंदाजीतही कमाल दाखवत 17 चेंडूत 4चौकार व 2षटकारासह 31 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. रवीला मयूर गोखलेने नाबाद 18 धावा करून साथ दिली

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
आदिनाथ क्रिकेट क्लब: 17.2षटकात सर्वबाद 64 धावा(अथर्व कदम 12, श्रेयश जगदाळे 11, आदित्य जाधव नाबाद 10, झंकार बाजीकर 2-8, रवी तलवार 2-13, प्रशांत उत्तेकर 1-4)पराभूत वि.अमर इलेव्हन: 4.5षटकात 2बाद 67 धावा(रवी तलवार 31(17,4×4,2×6), मयूर गोखले नाबाद 18, योगेश कोडगिरे 1-15);सामनावीर-रवी तलवार; अमर इलेव्हन संघाचा 8गडी राखून विजय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---