---Advertisement---

डेक्कन जिमखाना व पीएमडीटीए तर्फे महिलांसाठी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे ८ मार्च रोजी आयोजन

On: रविवार, फेब्रुवारी 27, 2022 6:34 PM
---Advertisement---

पुणे। डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली पीएमडीटीए मानांकन महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर 8 व 9 मार्च 2022 रोजी पार पडणार आहे.

तसेच, ही स्पर्धा 14वर्षाखालील एकेरी मुलींच्या गटात, तर खुल्या महिला दुहेरी या गटात पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व पीएमडीटीए गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून याची अंतिम तारीख 7 मार्च 2022 रोजी दुपारी 1.00 पर्यंत अशी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---