पुणे, दि. 7 मार्च 2023: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वात जुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्वप्नील फुलपगार(70धावा व 68धावा) याने केलेल्या फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने केडन्स संघाचा 198 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी केडन्स संघाचा आज19.7 षटकात 7 बाद 97धावापासुन खेळ पुढे सुरू झाला. तत्पूर्वी काल प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाने 39.7 षटकात सर्वबाद 238धावा केल्या. 10 गडी झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 188(वजा50)झाली. याच्या उत्तरात केडन्स संघाचा पहिला डाव 33.6 षटकात सर्वबाद 157 धावांवर संपुष्टात आला. 10 गडी बाद झाल्यामुळे केडन्स संघाची अंतिम धावसंख्या 107(वजा 50 धावा) झाली. यामध्ये हर्षद खडीवाले 26, अजिंक्य गायकवाड, 24, शुभम खरात नाबाद 54 यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखाना संघाकडून दिपक डांगी(3-27),आयुष काब्रा( 2-28), अजय बोरुडे(2-15), पियुष साळवी(1-25),आत्मन पोरे(1-31) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला पहिल्या डावात 81 धावांची आघाडी मिळवुन दिली.
दुसऱ्या डावात डेक्कन जिमखाना संघाने 20 षटकात 2बाद 208धावा केल्या. 2 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 198धावा(वजा 10 धावा झाली. यात स्वप्नील फुलपगार 68, हर्ष संघवी नाबाद 54, धीरज फटांगरे 33, तुषार श्रीवास्तव 22, अथर्व वनवे नाबाद 11 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. विजयासाठी 289धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या केडन्स संघाला 20 षटकात 4बाद 101 धावांपर्यंतच मजल मारता आली. 4 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 81धावा(वजा 20 धावा) झाली. यात निपुण गायकवाड 58, अजिंक्य गायकवाड 22, हर्षद खडीवाले 11 यांनी थोडासा प्रतिकार केला. डेक्कन जिमखाना संघाकडून धीरज फटांगरे(1-14), सोहम कुमठेकर(1-13), आयुष काब्रा(1-14), दिपक डांगी(1-17) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करुन संघाला 198 धावांनी विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
पहिला डाव : डेक्कन जिमखाना : 39.7 षटकात सर्वबाद 188(238-50)(स्वप्नील फुलपगार 70(83,8×4), अजय बोरुडे 52(64,4×4,1×6), अथर्व वणवे 42(70,3×4), धीरज फटांगरे 29, अक्षय वाईकर 3-51, इझान सय्यद 2-41, आर्या जाधव 2-31) वि.केडन्स: 33.6 षटकात सर्वबाद 107(157-50 धावा)(हर्षद खडीवाले 26(29,4×4), अजिंक्य गायकवाड, 24(24), शुभम खरात नाबाद 54(102), दीपक डांगी 3-27, आयुष काबरा 2-28, अजय बोरुडे 2-15, पियुष साळवी 1-25, आत्मा पोरे 1-31); डेक्कन जिमखाना संघाकडे पहिल्या डावात 81 धावांची आघाडी;
दुसरा डाव: डेक्कन जिमखाना: 20 षटकात 2बाद 198धावा(208-10 धावा)(स्वप्नील फुलपगार 68(41), हर्ष संघवी नाबाद 54(36), धीरज फटांगरे 33(37), तुषार श्रीवास्तव 22(24), अथर्व वनवे नाबाद 11, आर्या जाधव 2-47) वि.वि.केडन्स: 20 षटकात 4बाद 81धावा(101-20 धावा)(निपुण गायकवाड 58 (75), अजिंक्य गायकवाड 22, हर्षद खडीवाले 11, धीरज फटांगरे 1-14, सोहम कुमठेकर 1-13, आयुष काब्रा 1-14, दिपक डांगी 1-17); डेक्कन जिमखाना संघ 198 धावांनी विजयी.
(Deccan Gymkhana team enters semi-finals of PYC-Goldfield-Mandke Cup cricket tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या मैदानावरील ‘या’ 3 युक्त्या ठरल्या माईलस्टोन, गावसकरांची युक्ती सर्वात भारी
एकेकाळी खायचे वांदे असणारे पाच भारतीय, आज आहेत कोट्यवधी रुपयांचे मालक