पुणे, 23 फेब्रुवारी 2026 – डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व पुणे डिस्ट्रिक्ट अमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या कटककर करंडक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाने प्रथम क्रमांक पटकावत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टिळक तलावावर पार पडलेल्या या स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाने ४१३ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. मेट्रो सिटीने ७४ गुणांसह उपविजेतेपद पटकावले. ही स्पर्धा ६, ७, ८, ९, १०, १२, १४, १७, १८, ३०, ४०, ५० वयोगटात झाली.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहिर केळकर, क्लबचे समिती सदस्य व कटककर ग्रुपचे विश्वेश कटककर, अमित कुलकर्णी, कौस्तुभ राडकर, स्पर्धा संचालक शौर्य करंदीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमोल सावरकर, शुभांकर ठोसर आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल – ५० मीटर ब्रेस्टस्ट्र्रोक – ६ वर्षांखालील मुले – अगस्त्य कुलकर्णी (डाइव्ह इन) – १ मी. ०२ से., रुचिर राणे (पेगासूस हेल्थ क्लब) – १ मी. ११ से. अगस्त्य करंदीकर (डेक्कन जिमखाना) – १ मि. ३९ से. मुली – सावी देशपांडे (सोलारिस क्लब) – १ मि. १८ से., श्रीया जोशी (हार्मोनी अॅक्वेटिक क्लब) – १ मि. २० से., इनाया कुकडे (बिशप्स) – १ मि. २१ से.
७ वर्षांखालील मुले – अंगद सादलगे (डाइव्ह इन) – ५७.२२ से., विरांश कांढरे (मेट्रोसिटी क्लब) – १ मि. ०९ से., परिक्षित ब्रह्मे (डेक्कन जिमखाना) -१ मि. १० से. मुली – मीरा कडू (छत्रपती शाहू स्विमिंग क्लब) – ५९.४० से., काश्वी पाटणकर (चॅम्पियन्स क्लब) – १ मि., सान्वी मोडक (पेगासूस क्लब) – १ मि. ०३ से.
८ वर्षांखालील मुले – निमिश करडे (डेक्कन जिमखाना) – ५३.०३ से., विवान पडवळ (स्विफ्ट क्लब) – ५४.८७ से., अद्वैत चाकणकर (पेगासूस क्लब) – ५४. ८९ से. मुली – अवनी यादव (शार्क क्लब) – ५२.६२ से., नायरा कुमार (पेगासूस क्लब) – ५६.८८ से., इरा मुजुमदार (डेक्कन जिमखाना) – १ मि. ०५ से.
९ वर्षांखालील मुले – तारुष देशपांडे (मेट्रोसिटी क्लब) – ४८.२० से., रिआन सागर गाडगे (मेट्रो सिटी क्लब) – ५०.१९० से., कबीर साळवे (एसएम अॅक्वेटिक क्लब) – ५२.००९ से. मुली – प्रिशा बनसोड (मेट्रोसिटी क्लब) – ५३.६० से., श्रीनिका मेडसिंग (डाइव्ह इन) – ५४.०७ से., चार्वी पालरेचा (शार्क क्लब) – ५५.२१ से.
१० वर्षांखालील मुले – शिवांशू खोरटे (डेक्कन जिमखाना ) – ४६.३८ से. पार्थ रोंगे (छत्रपती शाहू स्विमिंग क्लब) – ४५.६६ से., शौर्यसिंह देशमुख (डेक्कन जिमखाना) – ४९.२० से. मुली – रोमिता कोंढरे (मेट्रोसिटी क्लब) – ४९.९४ से., परिनीती घटेशाही (डेक्कन जिमखाना) – ५०.०५१ से., जिजाई जाधव (डेक्कन जिमखाना) – ५०.९१ से.
१२ वर्षांखालील मुले – सत्यजितसिंह मोहिते (डेक्कन जिमखाना) – ४२.७२ से., अगस्त्य धावडे (डेक्कन जिमखाना) – ४७.५५ से., ऋग्वेद फाडके (सोलारिस क्लब) – ५०.९५ से. मुली – लावण्या करडे (डेक्कन जिमखाना) – ४६.८४ से., अभिज्ञ वाव्हळ (मेट्रोसिटी क्लब) – ४७.८२ से., तन्वी सक्सेना (डेक्कन जिमखाना) – ४८.०५८ से.
१४ वर्षांखालील मुले – नील पंडित (डेक्कन जिमखाना) – ३६.७७ से., ईशान एकबोटे (स्विफ्ट क्लब) – ३७.५७ से., निहार देवधर (डेक्कन जिमखाना) – ३८.१७ से. मुली – तिशा राठी (डेक्कन जिमखाना) – ४३.६१ से., तनिषा बुद्धीसागर (हार्मोनी क्लब) – ४४.४० से., अनिका काटकर (डेक्कन जिमखाना) – ४५.२१ से.
१७ वर्षांखालील मुले – यशोधन परनथमन (डेक्कन जिमखाना) – ३४.९३ से., साकेत जोशी (डेक्कन जिमखाना) – ३५.२४ से., अनय पाध्ये (डेक्कन जिमखाना) – ३६.७१ से.
३० वर्षांखालील पुरुष – सलिल भागवत (डेक्कन जिमखाना) – ३४.०९ से., अर्णव भाडेकर (डेक्कन जिमखाना) – ४२.०६४ से., आदित्य नरवडे (डेक्कन जिमखाना) – ४३.२५ से.






