पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत डेक्कन ब, डेक्कन अ, डेक्कन क, पीवायसी डॉन्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात अमलेश आठवले, बाबू जाधव, कौस्तुभ शहा, मंगेश प्रभुदेसाई यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन ब संघाने विनिंग एज अ संघाचा 20-14 असा पराभव केला.
डेक्कन क संघाने विनिंग एज ब संघावर 24-8असा सहज विजय मिळवला. विजयी संघाकडून सतीश बापट, केदार जोगळेकर, आशिष धोंडगे, समीर केकरे, मयूर संचेती, भरत ससाणे, शरद कल्याणी, राजेंद्र भोपळे यांनी अफलातून कामगिरी केली.
अन्य लढतीत डेक्कन अ संघाने सोलारिस क संघाचा 24-1 असा एकतर्फी पराभव केला. पीवायसी डॉन्स संघाने एमडब्लूटीए ब संघाचा 19-17असा संघर्षपूर्ण पराभव केला. पीवायसी डॉन्सकडून मधुर इंगळहळीकर, केदार देशपांडे, संजय मूर्ती, रणजित पांडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
डेक्कन ब वि.वि.विनिंग एज अ 20-14(100अधिक गट: धनंजय सुमंत/अमोल बापट पराभूत वि.टेकाळे/डॉ.निलेश 4-6; खुला गट: अमलेश आठवले/बाबू जाधव वि.वि.अविनाश पवार/गंगाप्रसाद 6-1; 90अधिक गट: बाळू जोशी/मनोज देशपांडे पराभूत वि.मंदार कापशीकर/मुकेश देशपांडे 4-6; खुला गट: कौस्तुभ शहा/मंगेश प्रभुदेसाई वि.वि.आशुतोष सावनी/आदित्य टेकाळे 6-1);
डेक्कन क वि.वि. विनिंग एज ब 24-8(100अधिक गट: सतीश बापट/केदार जोगळेकर वि.वि.शशिकांत जोशी/शैलेश नियोगी 6-0; खुला गट: आशिष धोंडगे/समीर केकरे वि.वि.सुनील अहिरे/सचिन कुलकर्णी 6-3; 90अधिक गट: मयूर संचेती/भरत ससाणे वि.वि.अजय सावरीकर/सचिन फणसाळकर 6-3; खुला गट: शरद कल्याणी/राजेंद्र भोपळे वि.वि.विठ्ठल गर्दे/डॉ.पवार6-2);
डेक्कन अ वि.वि.सोलारिस क 24-1(100अधिक गट: नंदन बाळ/अमित पाटणकर वि.वि.संभाजी शिंदे/मकरंद जोशी 6-0; खुला गट: संग्राम चाफेकर/मुकुंद जोशी वि.वि.मंदार काळे/हेमंत निगम 6-1; 90अधिक गट: जयदीप दाते/अजय कामत वि.वि.रवी भांडेकर/संजय अगरवाल 6-0; खुला गट: ऋषिकेश पाटसकर/विक्रांत साने वि.वि.श्रीकांत पवार/राजेंद्र पवार 6-0);
पीवायसी डॉन्स वि.वि.एमडब्लूटीए ब 19-17(100अधिक गट: प्रदीप मेड/अमोल काणे पराभूत वि.प्रमोद उमरजे/मंदार मेहेंदळे 4-6;खुला गट: मधुर इंगळहळीकर/केदार देशपांडे वि.वि.स्वेतल शहा/आशिष राणा 6-1; 90अधिक गट: संजय मूर्ती/रणजित पांडे वि.वि.मिलिंद घैसास/निशांत भागीया 6-4; खुला गट: तुषार नगरकर/अमोल काणे पराभूत वि.रवी अज्जमपुडी/प्रफुल आशेर 3-6).