सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यामध्ये पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ‘विराट कोहली’ने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले होते. त्यानंतर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत विराट फ्लाॅप ठरला. आता गाबा येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याची बॅट शांत दिसली. दरम्यान, आता माजी भारतीय खेळाजू ‘दीप दासगुप्ता’ने (Deep Dasgupta) विराटला गुरूमंत्र देत, त्याचा आवडता शॉट विसरायला सांगितले.
गाबा येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली (Virat Kohli) केवळ 3 धावा करून बाद झाला. ऑफ स्टंपबाहेरील चेंडूवर कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न करत असताना तो ‘जोश हेझलवूड’च्या (Josh Hazlewood) चेंडूवर यष्टीरक्षकाच्या हातात झेलबाद झाला. विराटचा हा शॉट पाहून दीप दासगुप्ताने त्याला आवडता शॉट विसरण्याचा सल्ला दिला आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना दीप दासगुप्ता म्हणाले, “ही एक मानसिक समस्या आहे, तांत्रिक समस्या नाही. तुम्ही इतके मोठे खेळाडू आहात. तुम्ही खूप काही करू शकता. तुम्हाला सिद्ध करण्याची देखील गरज नाही. कारण गेल्या 10-15 वर्षांत, तुम्ही किती महान खेळाडू आहात हे तुम्ही सिद्ध केले आहे.”
पुढे बोलताना दीप दासगुप्ता म्हणाले, “तुम्ही एकेकाळी बाऊंड्री एवढी मोठी केली होती की, थोडा वेळ लहान करा. मग हळूहळू जसे तुम्ही सेट व्हाल, तशी तुमची बाऊंड्री वाढत जाईल. पहिल्या 20 चेंडूं जे आहेत, थोडा वेळ विसरून जा की, तो तुमचा आवडता शॉट आहे. प्रेक्षकांचा आवडता शॉट आहे, कव्हर ड्राइव्ह आहे, सर्व विसरून जा.”
महत्त्वाच्या बातम्या-
गाबा कसोटीत भारतीय फलंदाज फ्लॉप झाल्यानंतर कोच गंभीरनं उचलली बॅट; VIDEO व्हायरल
रोहित-गंभीर यांच्यात सर्वकाही ठीक नाही, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
2 दिवसांचा खेळ बाकी अन् 16 विकेट्स हातात! टीम इंडिया गाबा कसोटी वाचवू शकते का?