भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर नेहमी आक्रमक दिसून येतो. बऱ्याचदा त्याचा हा आक्रमक स्वभाव खेळाडूंमध्येही उत्साह निर्माण करतो. विराटच्या या वर्तनावर भारताचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मतानुसार, भारताच्या कर्णधाराने मैदानावरील हावभावाबाबत अजून थोडे सावध राहिले पाहिजे. कारण त्याला लहान मुले देखील पाहत असतात.
दीप दासगुप्ता यांना एका युट्यूब चॅनलवर प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान कोहलीच्या हावभावाबद्दल विचारले गेले होते. त्याने न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यादरम्यान प्रेक्षकांना तोंडावर बोट ठेवत शांत बसण्याचा इशारा केला होता.
यावर ते म्हणाले, ‘मी त्या सामन्यावेळी साऊथॅम्प्टनमध्ये नव्हतो. म्हणून मला माहिती नाही की त्याने तिथे कसे वर्तन केले होते. परंतु तुमच्या काही गोष्टींशी मी सहमत आहे. मला माहिती आहे की तो भावनांच्या आहारी वाहत जातो. जसं की तुम्ही म्हणाला, विराटला अनेक लहान मुले देखील खेळताना पाहात असतात. विराट हा लाखो लहान मुलांसाठी आदर्श आहे. त्यामुळे मैदानावर त्याने शब्दांचा वापर करताना किंवा आपल्या कोणत्याही प्रकारचा इशारा करताना विचार करुन करावा.’
‘विराट कोहली हा असाच एक कर्णधार आहे, जो नेहमीच पुढाकार घेऊन संघाचे नेतृत्व करतो आणि सतत खेळाडूंशी बोलून किंवा इनपुट देत खेळाडूंना प्रेरणा देखील देत असतो. याचदरम्यान विराट जे योग्य आहे ते करण्यासाठी कधीच मागेपुढे पाहत नाही. मग ते विरोधाचे कौतुक करायचे असेल तरी तो त्याचे कौतुक करेल,’ असेही ते पुढे म्हणाले.
जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना न्यूझीलंडचा क्रिकेटपटू निल वॅग्नरही विराटच्या तोंडावर बोट ठेवून शांत बसण्याच्या इशाऱ्याबद्दल बोलला होता. ‘साऊथॅम्प्टनमधील काही लोक एक गाणे म्हणत होते. त्या गर्दीतील लोक झोंबी गाणं म्हणत होते. ते गाणं होतं की, तुमच्या डोक्यात कोहली, तुमच्या डोक्यात कोहली, कोहली. हे गाणं म्हणत लोक विराटला अपमानित करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर कोहलीने त्याला प्रत्युत्तर दिले व गप्प राहण्याचा इशारा केला होता,’ असे त्याने सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा वेश बदलून अभिनेता आमिर खान गेला होता दादाच्या घरी, सेक्युरिटी गार्डने केलतं बाहेर
जवळचा संघ सहकारी हरपल्याने कपिल देव भावुक, मुलाखतीदरम्यान ढसाढसा रडले
बापरे! ‘दादा’चे तब्बल ३६ कोटी रुपये देत नाहीयेत ‘या’ दोन कंपन्या; कोर्टात घेतली धाव