काही दिवसांपूर्वी मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचा श्रीलंका दौरा पार पडला. या दौऱ्यावर शिखर धवनच्या नेतृत्वात यूवा खेळाडूंचा भारतीय संघ निवडला गेला होता. दौऱ्यात भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरचाही समावेश होता. या दौऱ्यावेळी भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही इंग्लंडला होते. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड यांच्याकडे भारताच्या मर्यादीत षटकांचे प्रभारी प्रशिक्षकपद सोपवण्यात आले होते.
आता या दौऱ्यादरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत घडलेला एक मजेदार किस्सा दीपकने सांगितला आहे. द्रविड यांनी त्याला त्याचे वय विचारले होते आणि त्याची चेष्टा केली होती. त्याने आकाश चोप्राशी बोलताना हा किस्सा सांगितला आहे.
चाहरने सांगितले की, जेव्हा तो श्रीलंकेत पोहचला, तेव्हा द्रविड यांनी त्याला त्याचे वय विचारले होते. त्याने जेव्हा त्याचे वय सांगितले तेव्हा द्रविड यांनी त्याची चेष्टा केली आणि म्हणाले खर वय सांगतोय की रेकाॅर्डमध्ये दिलेले वय सांगत आहे. द्रविड यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की, अनेक खेळाडू जास्त काळापर्यंत खेळण्यासाठी त्यांच्या कागदोपत्री रेकाॅर्डमध्ये वय कमी दाखवतात. दीपक चाहर खरे वय सांगत आहे की, खोटे असे त्यांना म्हणायचे होते.
यानंतर दीपक चाहरने स्पष्ट केले की त्याने खरे वय सांगितले आहे आणि त्याच्याकडे त्याच्या वयामध्ये बदल करू शकत नाही, कारण त्याच्ये वडील भारतीय वायू सेनेत जवान होते.
आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना चाहरने हा किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला, “जेव्हा आम्ही श्रीलंकेला पोहोचलो, तेव्हा राहुल द्रविड सरांनी सर्वात आधी मला माझ्या वयाविषयी विचारले. मी त्यांना सांगितले की मी २८ वर्षांचा आहे आणि लवकरच २९ वर्षांचा होईल. त्यावर ते असे म्हणाले – ‘हे मुळ वय आहे की, क्रिकेटपटूचे वय आहे?’ नंतर मी सांगितले की माझे खरे वय आहे, कारण माझे वडील वायू सेनेमध्ये होते, त्यामुळे माझ्याकडे वय वाढवण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता.”
त्याने पुढे बोलताना असेही सांगितले आहे की, द्रविड यांनी युवा खेळाडूंवर खूप विश्वास दाखवला आहे आणि याच कारणास्तव त्याने त्यांच्या उपस्थितीमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. चाहरने गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही चांगले प्रदर्शन केले, ज्यामुळे भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश मिळाले.
चाहर पुढे बोलताना म्हणाला, “एका गंभीर क्षणी त्यांनी मला हे देखील सांगितले की, तुझ्याकडे ४-५ वर्षांचे कसोटी क्रिकेट बाकी आहे. ते शब्द माझ्याकडे तसेच राहिले आहेत. त्यांनी मला एक कसोटी फलंदाज मानले आहे. जेव्हा मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो आहे, मी नेहमी चांगले प्रदर्शन केले आहे. ते माझ्या क्षमतेला चांगल्या प्रकारे ओळखतात.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळलेले ३ दिग्गज आंतरराष्ट्रीय कर्णधार
केकेआर विरुद्ध आरसीबी खेळणार निळ्या जर्सीत, कारण ऐकून कराल कौतुक
चक्क इंग्लंडच्या अव्वल फलंदाजाने गायले भारतीय वेगवान गोलंदाजांचे गुणगान, म्हणाला…