भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाहीये. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल मोठा काळ दीपक चाहर दुखापतीमुळे संघातून बाहेर राहिला होता. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये त्याने पुनरागमन केले होते. पण पुन्हा दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला. असे असले तरी, वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा फिट झाला असल्याचे समोर येत आहे.
दीपक चाहर (Deepak Chahar) भारतीय संघाचा एक महत्वाचा आणि युवा गोलंदाज आहे. आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना चहरला दुखापत झाली होती. मे महिन्यात झालेली दुखापीमधून आता चहर सावरला आहे. चाहरने स्वतः आपल्या फिटनेसची माहिती माध्यमांना दिली. चाहर म्हणाला, “आता मी पूर्णपणे फिट आहे आणि राष्ट्रीय संघात पुनरागमनासाठी प्रयत्न करत आहे. मी नुकतीच आरपीएल (राजस्थान प्रीमियर लीग) खेळली आहे. रविवार (17 सप्टेंबर) पर्यंत मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होतो. भारतीय संघ आशियाई गेम्ससाटी चीनला जात आहे. मी सध्या त्यांच्यासोबत काम सराव करत आहे.”
“एका खेळाडूसाठी निराशा चांगली गोष्ट नसते. जी गोष्ट आपल्या हातात नसते, ती आपण नियंत्रित करू शकत नाही. माझ्या हातात फिट राहणे आणि संघासाठी उपलब्ध राहणे आहे. त्यासाठी मी तयार आहे. आताही संधी मिळाली, तर माझे 100 टक्के योगदान देईल. दुखापतीमुळे माझी कारकीर्द खूप प्रभावित झाले आहे. खेळाडूंची दुखापत त्यांच्या शरीरावर अबलंबून असते. काहीजणांना कमी दुखापत होते. पण मला सर्वकाही करूनही जास्त दुखापत होते. मी आहार आणि सरावावर पूर्ण लक्ष देत आहे.”
दरम्यान, दीपक चाहरने डिसेंबर 2022 मध्ये भारतासाठी आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. तसेच टी-20 क्रिकेटमधील त्याचा शेवटचा सामना ऑक्टोबर 2022 मध्ये पाहायला मिळाला होता. दुखापतीमुळे नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकता चाहरला खेळता आले नाही. तसेच आगामी आशियाई गेम्स आणि वनडे विश्वचषकात देखील चाहरला संघात स्थान मिळवता आले नाहीये. (Deepak Chahar available for selection in Indian team)
महत्वाच्या बातम्या –
उपकर्णधाराचे संघातील स्थान धोक्यात! ‘या’ कारणास्तव विश्वचषकातून नाव कापले जाणार?
विश्वचषकासाठी खास पाहुण्यांच्या यादीत सामील झाले रजनीकांत, जय शाह यांनी स्वतः दिले गोल्डन तिकिट