दुबई। भारतीय संघ आज (25 सप्टेंबर) एशिया कप 2018 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध सुपर फोरचा सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून 26 वर्षीय दिपक चहरने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
तो वनडेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा 223 वा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने याआधी याचवर्षी भारताकडून 8 जूलैला इंग्लंड विरुद्ध टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या टी20 सामन्यात त्याने 1 विकेट घेतली होती.
त्याला आज(25 सप्टेंबर) त्याच्या वनडे पदार्पणाची कॅप रवी शास्त्री यांच्या हस्ते देण्यात आली.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या एशिया कपमधील साखळी फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने दिपक चहरला या स्पर्धेसाठी संधी देण्यात आली होती.
त्याची यावर्षीची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही चांगली राहिली आहे. तसेच आयपीएलच्या 11 व्या मोसमात दीपक चहरने 12 सामन्यात 10 विकेट्स मिळवले आहेत.
त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघातही निवड झाली होती. या दौऱ्यात त्याने 6 सामन्यात सर्वाधिक 16 विकेट्स घेतल्या आहेत.
दिपक चहरला एकदा भारताचे माजी वादाग्रस्त प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी क्रिकेट सोडून द्यायचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर या खेळाडूने स्वत:ला सिद्ध करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
कोण आहे दीपक चहर-
दीपक चहर आयपीएलमध्ये 17 सामने खेळला आहे. त्याने 17मे 2016 ला आयपीएल पदार्पण केले होते तर शेवटचा सामना तो 27 मे 2018 रोजी वानखेडेवर खेळला आहे.
17 सामन्यात त्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये हा खेळाडू राजस्थान, पुणे आणि चेन्नई संघाकडून खेळला आहे.
देशांतर्गत क्रिकेट हा खेळाडू राजस्थान संघाकडून खेळतो. त्यात त्याने प्रथम श्रेणीच्या 41 सामन्यात 115 तर अ दर्जाच्या 19 सामन्यात 34 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–एमएस धोनी ठरला भारताचा आजपर्यंतचा सर्वात वयस्कर कर्णधार
-…आणि धोनी पुन्हा झाला टीम इंडियाचा कॅप्टन कूल
–रोहित, शिखरच्या शतकांमुळे चहलचा हा विक्रम राहिला दुर्लक्षित