नागपूर। आज(१० नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात(3rd T20I) भारताने ३० धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ३ सामन्यांची टी२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे.
भारताच्या या विजयात दीपक चाहरने(Deepak Chahar) हॅट्रिकसह ६ विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने ३.२ षटके गोलंदाजी करताना केवळ ७ धावा देत या ६ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने एक खास पराक्रम केला आहे. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये हॅट्रिक(hat-trick) घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन (Best figures in T20Is) करण्याचाही विक्रम रचला आहे.
चाहरने १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शफिउल इस्लामला बाद केले. त्यानंतर त्याने २० व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे मुस्तफिजूर रेहमान आणि अल-अमिन हुसेनला बाद करत हॅट्रिक साजरी केली.
तत्पूर्वी चाहरने लिटन दास आणि सौम्य सरकारला डावाच्या तिसऱ्याच षटकात लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले होते. त्यानंतर त्याने मोहम्मद मिथुनला बाद करत त्याची तिसरी विकेट घेतली होती.
असा झाला सामना –
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७४ धावा केल्या होत्या. भारताकडून केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केल्या. तर बांगलादेशकडून गोलंदाजीमध्ये शफिउल इस्लाम आणि सौम्य सरकारने प्रत्येकी २ विकेट्स आणि अल-अमिन हुसेनने १ विकेट घेतली.
त्यानंतर १७५ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला १९.२ षटकात सर्वबाद १४४ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून मोहम्मद नाईमने ८१ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली होती. भारताकडून गोलंदाजीत चाहत व्यतिरिक्त शिवम दुबेने ३ आणि युजवेंद्र चहलने १ विकेट घेतली.
आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन –
६ विकेट- ७ धावा – दीपक चाहर (विरुद्ध बांगलादेश, नागपूर, २०१९)
६ विकेट – ८ धावा – अजंता मेंडिस (विरुद्ध झिम्बाब्वे, हॅम्बॅन्टोटा, २०१२)
६ विकेट – १६ धावा – अजंता मेंडिस (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पाल्लेकेले, २०११)
६ विकेट – २५ धावा – युजवेंद्र चहल (विरुद्ध इंग्लंड, बंगळूरु, २०१७)
अश्विनचा दिल्ली कॅपिटल्समध्ये समावेश झाल्यानंतर प्रशिक्षक रिकी पॉटिंगने दिली ही प्रतिक्रिया
वाचा- 👉 https://t.co/oxv916Qo1l👈#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
युसूफ पठानने घेतलेल्या अप्रतिम झेलवर राशिद खान म्हणतो
वाचा- 👉https://t.co/3xhb04XBB7👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019