आयपीएलचा २०२२ चा मेगा लिलाव ( IPL 2022 auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल झाले, तर काही खेळाडू अनसोल्ड राहिले. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (deepak chahar ) याला चेन्नईने १४ कोटींना विकत घेतले आहे. या लिलावात तो इशान किशननंतरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दीपक चहर पुन्हा सीएसकेमध्ये (CSK ) परत आल्याने आणि एवढी मोठी रक्कम मिळाल्याने तो नक्कीच खूप आनंदी आहे, परंतु तरीही तो एका गोष्टीमुळे निराश आहे.
आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरलेल्या चहरच्या भावाने म्हणजेच राहुल चहरने सुद्धा यावेळी लिलावात सहभाग घेतला होता. यावर्षी कदाचित दोन्ही भावांचे एकत्र खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा दीपकला होती. पण तसे काहीच झाले नाही. हे दोघे भाऊ २०१७ आणि २०१८ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होते. पण एक प्लेइंग इलेव्हनमध्ये कधीच त्यांचे नाव आले नाही.
दीपक चहरची ही इच्छा यावेळीही पूर्ण होऊ शकली नाही. एका क्रिकेट संकेतस्थळाने दीपकच्या हवाल्याकडून माहिती देत सांगितले की, तो पुढील वर्षी आपल्या भावाला पंजाब सोडून चेन्नई संघात येण्यास सांगेल. चहर म्हणाला की, “पुण्यात मी पहिला सामना खेळला, नंतरचा दुसरा त्याने खेळला, मी तिसरा खेळला, त्याने चौथा खेळला. पण आम्ही एकत्र खेळलो नाही. मी विचार करत होतो की कदाचित या लिलावानंतर आम्ही एकत्र खेळू, पण कदाचित पुन्हा कधीतरी. मी राहुलला पुढील वर्षी पंजाब सोडून चेन्नईला येण्यास सांगेन.
दीपक चहरला चेन्नईने १४ कोटींना खरेदी केले, तर राहुलला पंजाब किंग्जने ५.२५ कोटींना खरेदी केले. याआधी राहुल मुंबई इंडियन्स संघामध्ये होता, पण गतवर्षी त्याला संघाने रिटेन केले नाही. राहुलला पंजाब किंग्ज संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. कारण, तो एक फिरकी गोलंदाज म्हणून संघासाठी चांगला पर्याय आहे. त्याच्याशिवाय हरप्रीत ब्रार हा पंजाबसाठी आणखी एक चांगला फिरकी गोलंदाज म्हणून पर्याय आहे.
आयपीएल २०२२ च्या लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले. या लिलावात ११ खेळाडूंवर १० कोटींहून अधिक खर्च झाला, जी एका लिलावात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वात जास्त भारतीय खेळाडूचा समावेश होता. आयपीएल २०२२ ही स्पर्धा मार्च महिन्यात खेळली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
नॅशनल ड्यूटीमुळे शाकिब आयपीएल लिलावात राहिला अनसोल्ड? पत्नीने सांगितले खरे कारण (mahasports.in)
अनसोल्ड गेलेल्या अमित मिश्रासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघमालकाची भावूक पोस्ट; लिहीले… (mahasports.in)
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा (mahasports.in)