---Advertisement---

Second ODI: मॅच विनिंग प्रदर्शनानंतरही दीपक चाहरला का बसवलं बाकावर? कारण आले पुढे

On: शनिवार, ऑगस्ट 20, 2022 1:19 PM
Deepak-Chahar-KL-Rahul
---Advertisement---

भारत विरुद्ध झिम्ब्बाब्वे संघात शनिवारी (२० ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब येथे दुसरा वनडे सामना खेळला गेला. १० विकेट्सने पहिला वनडे सामना जिंकलेला भारतीय संघ हा सामनाही खिशात घालत मालिकेवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसला. दुसरीकडे झिम्बाब्वे संघानेही मालिकेत पुनरागमन करण्यासाठी पूर्ण जोर लावला. या सामन्यासाठी पाहुण्या भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला. दीपक चाहर याला बाकावर बसवण्यात आले. ज्यानंतर चाहरला संघाबाहेर करण्यामागचे कारण काय आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर राहुलने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. राहुल म्हणाला की, “भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे, वेगवान गोलंदाज दीपक चाहरला (Deepak Chahar) बाहेर बसवण्यात आले आहे. त्याच्याजागी शार्दुल ठाकूरचे संघात पुनरागमन झाले आहे.”

चाहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातून ६ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले होते. या पुनरागमनाच्या सामन्यात त्याने मॅच विनिंग प्रदर्शन करत सामनावीर पुरस्कारही जिंकला होता. या सामन्यात त्याने ७ षटके फेकताना अवघ्या २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या १० षटकात संघाला ३ महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने मिळवून दिल्या होत्या. या उल्लेखनीय प्रदर्शनानंतरही चाहरला बाहेर बसवण्याचा निर्णय घेत कर्णधार राहुलने सर्वांचा अचंबित केले.

काय आहे दीपक चाहरला संघाबाहेर करण्याचे कारण?
नाणेफेकीनंतर राहुलने चाहरला बाहेर करण्याच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली. राहुल म्हणाला की, “चाहरला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. दुखापतीनंतर ६ महिन्यांच्या ब्रेकनंतर चाहर पुन्हा मैदानावर उतरला आहे. त्यामुळे त्याच्यावर अचानक जास्त वर्कलोड टाकता येणार नाही. याच कारणास्तव दक्षता म्हणून त्याला संघाबाहेर बसवण्यात आले आहे.” 

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

२८१ सामने खेळलेल्या भारतीय क्रिकेटरचा क्रिकेटला अलविदा! सप्टेंबर महिन्यात खेळणार शेवटचा सामना

मोईन अलीचा सीएसकेला दगा! दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळण्याचा घेतला निर्णय

कौतुक करावे तितके कमीच! झिम्बाब्वे बोर्डाने भारताविरुद्धची दुसरी वनडे ‘या’ लोकांना केलीय समर्पित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---