दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघ विजय मिळवणार अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु रविवारी (२३ जानेवारी) झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ आला होता. परंतु शेवटी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरचा (Deepak chahar) एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी २८८ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील इतर फलंदाज फ्लॉप ठरले असताना, दीपक चाहरने अप्रतिम खेळी करत तुफानी अर्धशतक झळकावले. यापूर्वी गोलंदाजी करताना त्याने २ गडी बाद केले होते. परंतु ही खेळी भारतीय संघाच्या कामी आली नाही. हा सामना भारतीय संघाने ४ धावांनी गमावला.(Deepak chahar emotional photo)
सामना झाल्यानंतर तो भलताच नाराज झाला होता. पराभव झाल्यानंतर त्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो बाद होऊन माघारी परतल्यानंतर खुर्चीच्या मागे तोंड लपवताना दिसून येत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील नैराश्य तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता.
Heartbreaking day for team India, especially Deepak Chahar. pic.twitter.com/uWGt5HFi7L
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 23, 2022
🌟Deepak did more than enough for the team.Please keep playing him irrespective of who comes or goes.#ChaharMustPlay @beastieboy07
🌟And a request to KL to please bat in the middle order, the opening is sorted with enough options.#DeepakChahar #INDvSA #KLRahul pic.twitter.com/z2yr2ipvfK— Yash Sinha (@yashsinha010) January 23, 2022
Tears from the eyes of Deepak Chahar. pic.twitter.com/6MYISm9s2B
— Johns. (@CricCrazyJohns) January 23, 2022
https://twitter.com/imhkohlii/status/1485512234893979648?t=wAzdhqeZXkHc8u1c8uJrPg&s=19
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना , २८७ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये क्विंटन डी कॉकने सर्वाधिक १२४ धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या २८३ धावा करण्यात यश आले. ज्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ४ धावांनी आपल्या नावावर केला. ही मालिका दक्षिण आफ्रिका संघाने ३-० ने आपल्या नावावर केली.
महत्वाच्या बातम्या :
ऋतुराजवर अन्याय झालाय?, जबर फॉर्ममध्ये असूनही खेळण्याची संधी न दिल्याने भडकले भारतीय चाहते
पप्पा विराटची झेरॉक्स कॉपी आहे ‘वामिका’, तिसऱ्या वनडेदरम्यान दिसली पहिली झलक; तुम्हीही बघा
हे नक्की पाहा: