---Advertisement---

भारतीय संघात परतणार ‘हा’ स्टार खेळाडू? केलं मोठं वक्तव्य म्हणाला….

On: बुधवार, ऑगस्ट 28, 2024 12:58 PM
devdutt padikkal
---Advertisement---

भारताचा युवा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी आशावादी आहे. आगामी दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) चांगल्या धावा करून भारतीय कसोटी संघाच्या मधल्या फळीत आपलं स्थान पक्कं करणं हे त्याचं ध्येय आहे. पडिक्कलनं या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केलं होतं, तर (5 सप्टेंबर) पासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये तो ‘ड’ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पडिक्कलनं (2023-24) रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यां 4 सामन्यात 556 धावा केल्या. दरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 93च्या वर होती. त्यानं 3 शतकंही झळकावली. भारतीय संघात झालेल्या पदार्पणावर बोलताना तो म्हणाला, “जेव्हा मी त्या सामन्यात फलंदाजीला गेलो तेव्हा मला वाटलं की मी तयार आहे. मला वाटलं की मी ते स्थान मिळवले आहे. खूप देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर आणि तिथे खूप धावा केल्यानंतर मला चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळाला.”

पडिक्कल मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याच्या स्ट्राइक रेटवरही काम करत आहे. तो म्हणाला, “मला टी20 क्रिकेट अधिक आक्रमक अंदाजात खेळायचे आहे आणि मला सुधारणा दिसत आहे. हे आव्हानात्मक आहे पण मानसिकता बदलण्याची गरज आहे.”

देवदत्त पडिक्कलच्या (Devdutt Padikkal) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 1 कसोटी आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये पदार्पण सामन्यातचं पडिक्कलनं शानदार अर्धशतक झळकावलं होतं. दरम्यान त्याची सरासरी 65 आहे, तर सर्वोच्च धावसंख्या 65 आहे. 2 टी20 सामन्यात त्यानं 19च्या सरासरीनं 38 धावा केल्या. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 100 राहिला.

महत्त्वाच्या बातम्या-

जय शाह आयसीसी अध्यक्ष बनले, आता बीसीसीआयचे सचिव कोण होणार? हे 3 नावं आघाडीवर
बिग बॅशमध्ये भारतीयांचे वर्चस्व; खेळाडूंच्या विक्रमाची नोंदी
कॅरेबियन संघाचा आफ्रिकेला दे धक्का! टी20 मालिकेत क्लीन स्वीप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---