---Advertisement---

पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात देण्यात आला ‘जगावेगळा’ पुरस्कार; चहर ठरला मानकरी

On: गुरूवार, नोव्हेंबर 18, 2021 10:17 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने २० षटकात ६ गडी बाद १६४ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य मिळाले. न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टिलने ७० आणि मार्क चॅपमनने ६३ धावा केल्या आणि दोघांनी १०९ धावांची भागीदारी केली. सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात एक अनोखा आणि मनोरंजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर एक अनोखा आणि मनोरंजक पुरस्कार देण्यात आला. ‘अमेझिंग मोमेंट अवॉर्ड’, म्हणजेच सामन्यातील सर्वात मनोरंजक क्षणासाठी खेळाडूला बक्षीस देण्यात आले. भारतीय गोलंदाज दीपक चहरने हा पुरस्कार आपल्या नावे केला. ज्या घटनेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. ती घटना न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलची विकेट घेतल्यानंतर घडली. विकेट घेतल्यानंतर दीपक चहरने ज्या पद्धतीने मार्टिन गप्टिलकडे रोखून पाहिले त्यामुळे त्याला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सामन्यादरम्यान, चहरच्या चेंडूवर ‘नो-लूक’ शॉटवर षटकार मारताना मार्टिन गप्टिलने दीपक चहरकडे रोखून पाहिले. प्रत्युत्तरादाखल, दीपक चहरने गुप्टिलला झेलबाद करत त्याच्याकडे तशाच पद्धतीने रोखून पाहिले होते.

तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते. न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६४ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावा केल्या. त्याने कर्णधार रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. रोहितने ४८ धावांचे योगदान दिले. डॅरिल मिशेलच्या डावातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर रिषभ पंतने चौकार मारून भारताला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. तो १७ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १७ धावा करून नाबाद परतला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्डने ३१ धावांत २ बळी घेतले, तर टीम साऊदी, मिचेल सँटनर आणि डॅरिल मिशेलने १-१ बळी घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---