---Advertisement---

याला म्हणतात प्रतिभा! दिपक चाहरच्या भेदक गोलंदाजीने जिंकली सर्वांची मने, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 12:24 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर रोखले होते. प्रत्युत्तर, चेन्नईने हे आव्हान ६ गडी राखून पूर्ण केले. दिपक चाहरने चार बळी मिळवून आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.

चेन्नईची भेदक गोलंदाजी
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दिपक चाहरने चेन्नईसाठी पहिले षटक टाकले. पहिल्या षटकातील चौथ्या स्विंग चेंडूवर त्याने सलामीवीर मयंक अगरवालला त्रिफळाचीत केले. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडने ख्रिस गेलचा झेल सोडला.

दिपकच्या वैयक्तिक दुसऱ्या व डावातील पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर गेल रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन परतला. दोन चेंडूनंतर निकोलस पूरनला शून्यावर बाद करत त्याने आपला तिसरा बळी मिळवला. आपल्या अखेरच्या आणि पंजाबच्या डावाच्या सातव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर दीपक हुडाला बाद करून आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदा एका डावात ४ बळी मिळवले. दिपकने आपल्या ४ षटकात १३ धावा देत एका निर्धाव षटकासह ४ बळी आपल्या नावे केले.

https://twitter.com/Balamur95855090/status/1383107733927305216

चेन्नईचा एकतर्फी विजय
या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. दिपक चाहरने आपल्या चार षटकांमध्ये अवघ्या १३ धावा देऊन ४ बळी आपल्या नावे केले. सॅम करन, मोईन अली व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्याला चांगली साथ दिली. पंजाबसाठी शाहरुख खानने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे पंजाबने निर्धारित २० षटकात ८ बाद १०६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात, चेन्नईची सुरुवात संथ झाली. ऋतुराज गायकवाड १६ चेंडूत ५ धावा काढून बाद झाला. दुसऱ्या गड्यासाठी फाफ डू प्लेसिस व मोईन अली यांनी ६६ धावांची भागीदारी केली. अलीने आक्रमक ४६ धावा केल्या. सुरेश रैना(८) व अंबाती रायडू(०) झटपट बाद झाले. अखेरीस, डू प्लेसिस(३६) व सॅम करनने(५० विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दिपक चाहरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या – 

जडेजा ऑन फायर!! केएल राहुलला ‘रॉकट थ्रो’ करत केले धावबाद,पहा व्हिडिओ

नाद करायचा नाही! जडेजाने केवळ अफलातून धावबादच केले नाही, तर दोन भन्नाट झेलही घेतले, पाहा व्हिडिओ

PBKS vs CSK: गोलंदाजीनंतर धोनी ब्रिगेडची फलंदाजीतही कमाल; चेन्नईचा पंजाबवर ६ गडी राखून दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---