झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात सोमवारी (२२ ऑगस्ट) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना झाला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने खिलाडूवृत्ती दाखवली, ज्यासाठी त्याचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे.
चाहरकडे (Deepak Chahar) या सामन्याच्या (India vs Zimbabwe) सुरुवातीला झिम्बाब्वेच्या फलंदाजाला मंकडिंग पद्धतीने (Mankding) बाद करण्याची संधी होती. परंतु त्याने तसे न करता मोठ्या मनाने त्या फलंदाजाला जीवनदान दिले. त्याच्या या कृतीची क्रिकेट चाहते प्रशंसा करत (Deepak Chahat Spirit Of Sports) आहेत.
तर झाले असे की, झिम्बाब्वेकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ताकुद्ज़्वानाशे कैटानो आणि इनोसेंट काइया आले होते. तर भारताकडून पहिले षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज दीपक चाहर आला होता. चाहर डावातील पहिलाच चेंडू टाकायला जात असताना, काइया नॉन स्ट्राईकरवरील क्रिजपासून बराच पुढे गेला होता. अशात चाहरने चेंडू फेकण्यापूर्वी क्रिजपासून पुढे गेलेल्या काइयाला धडा शिकवला. त्याने चेंडू स्ट्राईकवरील फलंदाजाकडे न फेकता थेट यष्टीला मारला.
यानंतर जर चाहर पंचांकडे मंकडिग बादसाठी अपली करत काइयाला धावबाद करू शकला असता. परंतु त्याने असे केले नाही. परिणामी हा चेंडू डेड बॉल घोषित केला गेला.
Deepak Chahar didn't Appeal on Mankad 😂 pic.twitter.com/4ihfnljbMl
— Keshav Bhardwaj 🇮🇳 (@keshxv1999) August 22, 2022
काय सांगतो मंकडिंगचा नियम?
आयसीसीने यावर्षी मंकडिंगला कलम ४१.२६ नुसार फलंदाजाला धावबाद करण्याच्या नियमात (३८) रूपांतरित केले आहे. अर्थात आता मंकडिंगला खेळ भावनेच्या विरोधात न मानले जाता हादेखील फलंदाजाला बाद करण्याचा एक प्रकार बनला आहे. मंकडिंग नियमानुसार जर गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्राईकवरील फलंदाज क्रिजच्या बाहेर गेला, तर गोलंदाज त्याला धावबाद करू शकतो. हा चेंडू ग्राह्य धरला जात नाही, परंतु फलंदाजाला मात्र बाद दिले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
आज जागतिक वडापाव दिन, त्यानिमित्ताने पाहा कोणत्या भारतीय क्रिकेटरला काय आवडते?
आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ‘ऍलन विल्किंंस’
अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्सच्या संघात महाराष्ट्राचा अभिनंदन पाटीलची लक्षवेधी कामगिरी