---Advertisement---

VIDEO: टीम इंडियाचे मालिकाविजयानंतर ‘फुल्ल धिंगाणा’ सेलिब्रेशन; गिल-ईशानने तर मर्यादा…

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 11:40 PM
---Advertisement---

केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने झिम्बाब्वे दौऱ्यात निर्भेळ यश मिळवले. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत त्यांनी यजमान झिम्बाब्वे संघाला ३-० असे पराभूत करत, मालिका आपल्या नावे केली. या विजयानंतर भारतीय संघ आनंदोत्सव साजरा करताना दिसले. शिखर धवनने इंस्टाग्रामवरून पोस्ट केलेल्या ‌‌व्हिडिओत भारतीय संघातील सर्व खेळाडू तुफान डान्स करताना दिसून येत आहेत.

भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून आधीच मालिका आपल्या नावे केली होती. तिसऱ्या सामन्यातही भारताचा हा विजयरथ थांबला नाही. शुबमन गिलच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २९० धावांचे आव्हान झिम्बाब्वे संघाला दिले होते. या धावांचा पाठलाग करताना अनुभवी अष्टपैलू सिकंदर रझाने एकाकी झुंज दिली. त्याने ११५ धावांची खेळी केली. मात्र, तो बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेच्या इतर खेळाडूंना विजयी लक्ष गाठण्यात अपयश आले व संघाला १३ धावांनी पराभूत व्हावे लागले.

https://www.instagram.com/reel/ChkXuF0j1-l/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

भारतीय संघाच्या या विजयानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये तुफान सेलिब्रेशन करताना दिसले. भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व भारतीय खेळाडू काला चश्मा या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ईशान किशन व शुबमन गिल यांच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओला शिखरने ‘दॅट्स हाऊ वी सेलिब्रेट विन’ असे कॅप्शन दिले. अगदी अल्पावधीत हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या आयपीएल संघाच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---