वेस्ट इंडीजच्या संघातील खेळाडूंना जगभरात मस्ती आणि पार्टी करण्यासाठी ओळखले जाते. त्यामधील आयपीएलमध्ये खेळत असलेले ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि ड्वेन ब्राव्हो यांसारखे दिग्गज वेस्ट इंडीज खेळाडू आपल्या चमकदार खेळीसोबतच त्यांच्या वेगवेगळ्या शैलीनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असलेल्या दीपक चाहरने कपिल शर्माच्या टीव्ही शोमध्ये त्याचा संघसहकारी ड्वेन ब्राव्हो हा दरवर्षी आयपीएलमध्ये नवीन गर्लफ्रेंडसोबत येत असल्याचा खुलासा केला होता.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्माने प्रथम तो ख्रिस गेलचा चाहता असल्याचे सांगितले होते. कपिल म्हणाला होता की, “गेलने त्याच्या घराचे फोटो मला दाखवले होते. त्याच्या घराच्या मजल्यावर स्विमिंग पूल असून त्या फोटोत त्याच्या पत्नीसमवेत त्याच्या एक्स गर्लफ्रेंडही दिसल्या. तेव्हा मी त्याला विचारले की यात तर तुझी पत्नी पण आहे. तर तो म्हणाला होता, हो परंतु याविषयी तिला काहीच अडचण नाही.”
कपिल शर्माने ख्रिस गेलच्या सांगितलेल्या या किस्स्यानंतर दीपक चाहर म्हणाला होता की, “आमच्याही संघातील ड्वेन ब्राव्होला तीन गर्लफ्रेंड असून त्याला त्या गर्लफ्रेंडपासून मुलेही आहेत. परंतु त्याने अजूनही लग्न केले नाही. दरवर्षी तो आयपीएलमध्ये नवीन गर्लफ्रेंडसोबत येतो.”
ड्वेन ब्राव्हो हा सध्या दोन मुलांचा पिता आ,हे परंतु त्याने लग्न केलेले नाही. त़्याच्या सध्याच्या गर्लफ्रेंडचे नाव जोसना खिता गोंजाल्वेस असून ब्राव्होचे बर्याच वर्षांपासून तिच्याशी संबंध आहेत आणि दोघांनाही एक मुलगा देखील आहे. या अगोदर ब्राव्होचे नाव रेजिना रामजित आणि नताशा सूरी यांच्यासोबत जोडले होते. आयपीएलमध्ये ब्राव्हो चेन्नईशिवाय मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे. त्याने आयपीएल मध्ये एकूण 130 सामने खेळले असून यामध्ये त्याने 1510 धावा केल्या आहेत; तर 156 बळी मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे! ‘माही’ने स्टाफ मेंबरला केला सलाम, फोटो तूफान व्हायरल
जेव्हा कोहली धोनीचे ग्लोव्हज घालून करतो त्याचीच नक्कल, Video पाहून जुन्या आठवणी होतील ताज्या