---Advertisement---

रोहितचा तब्बल १५ वर्षाआधीचा फोटो चाहरने केला शेअर; खास कॅप्शन देत लिहीले…

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेची सुरुवात बुधवारी (१७ नोव्हेंबर) झाली. जुयपूरमध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले आणि त्याच्याच जोरावर संघाने विजय मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज दीपक चाहरला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले होते. भारतीय संघासाठी दीपक महागात पडला, पण त्याने एक महत्वाचा बळी घेतला. अशातच दीपकने सामन्यानंतर एक खास फोटो शेअर केला आहे.

भारतीय संघाला या सामन्यात रोहित शर्माच्या रुपात नवीन टी२० कर्णधार आणि राहुल द्रविडच्या रूपात नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाले, त्यांच्यासाठी हा नवीन भूमिकेतील पहिला विजय  ठरला आहे. या सामन्यादरम्यान गोलंदाज दीपक चाहरने नवनियुक्त कर्णाधार रोहित शर्मासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. चाहत्यांना हा फोटो खूपच आवडल्याचे दिसत आहे.

दीपक चाहरने हा फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला. हा फोटो जवळपास १५ वर्षांपूर्वी जयपूरमध्ये काढलेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळला गेलेला पहिला टी२० सामना देखील याच स्टेडियावर खेळला गेला. पोस्टमध्ये दीपकने या सामन्यातील रोहित शर्मासोबतचा फोटो आणि जुना फोटो एकत्र जोडला आहे. दीपकने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जवळपास १५ वर्षांनंतर त्याच मैदानावर आमचा फोटो, त्यावेळी माझी आणि रोहित भैयाची दाढी नव्हती.’ चाहतेही दीपकने केलेल्या या पोस्टवर रिएक्ट करत आहे आणि कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

https://www.instagram.com/p/CWZ_BKUpz0K/?utm_medium=copy_link

दरम्यान, पहिल्या टी२० सामन्यात दीपक चाहर भारतीय संघासाठी महागात पडल्याचे दिसले. त्याने या सामन्यात चार षटकांमध्ये ४२ धावा दिल्या आणि एक विकेट घेतला. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घतेला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना १९.४ षटकात पाच विकेट्सच्या नुकसानावर १६६ धावा केल्या आणि विजय मिळवला. यामध्ये भारताच्या सूर्यकुमार यादव (६२) आणि रोहित शर्मा (४८) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याव्यतिरिक्त संघासाठी रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---