आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. परंतु त्याआधीच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाला मोठे धक्के बसले आहेत. त्यांचा मुख्य फलंदाज सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे आयपीएलच्या या हंगामातून बाहेर पडला आहे. असे असतानाच, सीएसकेचा प्रमुख मध्यमगती वेगवान गोलंदाज दीपक चाहर व फलंदाज रुतूराज गायकवाड हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. Deepak Chahar Test Covid-19 Positive
माध्यमांतील काही वृत्तांनुसार सीएसकेमधील कमीत कमी १३ सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दीपक व्यतिरिक्त सीएसकेचा ऋतुराज गायकवाडचाही समावेश आहे. त्यामुळे आता सीएसकेच्या सदस्यांचा क्वारंटाईनचा कालावधी वाढविण्यात आल्याने त्यांच्या ट्रेनिंगलाही उशिरा सुरुवात होईल. खेळाडूंची नाव जरी घोषीत केली नसली तर याबद्दल आयपीएलने अधिकृत्त प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
दीपक हा गेल्या २ वर्षांपासून सीएसके संघाचा भाग आहे. दरम्यान त्याने २९ सामन्यात गोलंदाजी करताना ३२ विकेट्स आपल्या खात्यात नोंदवल्या आहेत. तर, २९ सामन्यातील ६ डावात फलंदाजी करताना ५७ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त तो राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.
दुसऱ्या बाजूला रुतुराज गायकवाड आतापर्यंत केवळ प्रथम श्रेणी, अ दर्जा व देशांतर्गत टी२० सामने खेळला आहे. त्याचा हा आयपीएलचा पहिलाच हंगाम ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुरंदरचा धुरंधर घेणार सुरेश रैनाची जागा
सुरेश रैनाच्या बाहेर जाण्याने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला लागणार ब्रेक
आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा पुणेकर क्रिकेटर कोरोना पाॅझिटिव्ह
ट्रेंडिंग लेख –
एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा
IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक
१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू