---Advertisement---

आशीर्वाद लाखाचा! सामन्यापुर्वी चाहर शमीच्या पाया पडला अन् मैदान मारलं, पाहा तो नेत्रदिपक क्षण

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 10:30 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या ८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदवला. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दीपक चाहरने सामन्यापूर्वी असे काही कृत्य केले होते, ज्याचे फोटोज् सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत पंजाब किंग्ज संघाच्या फलंदाजांना सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते. दीपक चाहरने सुरुवातीच्या ४ षटकात अवघ्या १३ धावा देत ४ महत्वाचे गडी बाद केले होते. त्याने मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन आणि दीपक हुड्डा यांना बाद केले होते.

या सामन्यापूर्वी दीपक चाहर मोहम्मद शमीचे चरण स्पर्श करत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहते आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अनेक युजर असेही म्हणत आहेत की, ‘मोहम्मद शमीच्या आशीर्वादामुळेच दीपक चहरला चांगली कामगिरी करण्यात यश आले.’

 

शाहरुख खानने दिली एकहाती झुंज
पंजाब किंग्ज संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना, संघात नव्याने सहभागी झालेल्या शाहरुख खानने पंजाब किंग्ज संघाला १०० धावांचा आकडा पार करून देण्यात मोलाची भुमिका बजावली. संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतल्याने पंजाब किंग्ज संघ अडचणीत आला होता. अशावेळी शाहरुखने ३६ चेंडूत ४७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यात त्याने २ षटकार आणि ४ चौकार लगावले. २० षटक अखेर पंजाब किंग्ज संघाला १०६ धावा करण्यात यश आले होते.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने मिळवला एकहाती विजय
पंजाब किंग्ज संघाने दिलेल्या १०७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फाफ डू प्लेसिसने ३६  धावांची खेळी केली. तर, मोईन अलीने ताबडतोड ४६ धावा धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाड ५ धावा करत माघारी परतला होता. या विजयासोबतच चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत पहिला विजय साजरा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बलाढ्य चेन्नईचा पंजाबवर एकहाती विजय, कर्णधार राहुलने ‘यांना’ दारुण पराभवास धरले जबाबदार

फुल ऑन एंटरटेनमेंट! लाईव्ह सामन्यात ड्वेन ब्रावोला चढला ‘वाथी फिवर’, व्हिडिओ होतोय व्हायरल

एमएस धोनीची सीएसकेकडून सामन्यांची ‘डबल सेंचूरी’; म्हणाला, आता मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---